
Mapusa Head Constabale Harrasment Case
म्हापसा: अधिकारी वर्गाकडून आपली छळवणूक होत असल्याचा आरोप करीत आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या हेड कॉन्स्टेबल तुकाराम शिरोडकर (तुक्स) याला पर्वरी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, त्याची जबानी घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आले.
मांडवी नदीवरील अटल सेतूवरुन आत्महत्या करणार असे सांगत असल्याचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पर्वरी पोलिसांनी संबंधिताचा शोध घेतला असता तो अटल सेतूवर आढळला. त्याला गोमेकॉत वैद्यकीय तपासणीसाठी भरती केले होते. त्यानंतर त्याला पोलिस स्थानकात आणून त्याची जबानी घेण्यात आली. याप्रकरणाचा सविस्तर अहवाल येत्या दोन दिवसांत सादर करण्याचे म्हापसा उपअधीक्षकांना वरिष्ठांनी निर्देश दिले आहेत.
तुकाराम शिरोडकर हे म्हापसा पोलिस स्थानकाशी संलग्न आहेत, मात्र त्यांना तात्पुरता उत्तर जिल्हा राखीव लाईन दल (एनडीआरएलएफ) नियुक्त केले होते. गेल्या ऑक्टोबर २०२४ पासून ते राखीव लाईनमध्ये होते.
तुकाराम यांनी व्हिडिओत म्हापसा पोलिस स्थानकाचे एक वरिष्ठ अधिकारी आपली सतावणूक करीत आहेत, असा दावा केला होता. त्यामुळे आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी आपल्या हातावर ब्लेडच्या साहाय्याने वार करून दुखापत करून घेतली होती, असे सूत्रांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.