varsha usgaonkar award Dainik Gomantak
गोवा

Goa State Film Festival: वर्षा उसगावकर यांना 'जीवनगौरव पुरस्कार', राज्य चित्रपट महोत्सवाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शुभारंभ

Goa State Film Festival 2025: गोव्याची लोकप्रिय अभिनेत्री, गायिका वर्षा उसगावकर यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल

Akshata Chhatre

lifetime achievement award: गोव्याच्या चित्रपटसृष्टीचा गौरव वाढवण्यासाठी आयोजित केलेल्या १०व्या, ११व्या आणि १२व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचा गुरुवार (१४ ऑगस्ट) भव्य शुभारंभ होणार आहे. पणजी येथील आयनॉक्स स्क्रीन १ येथे दुपारी ३:३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आमदार तथा एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ESG) च्या उपाध्यक्ष दिलायला लोबो यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होईल.

वर्षा उसगावकर यांना जीवनगौरव

यावर्षीचा महोत्सव खास आहे, कारण या निमित्ताने गोव्याची लोकप्रिय अभिनेत्री, गायिका वर्षा उसगावकर यांना अतुलनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. नामवंत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना रविवार, १७ रोजी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

७५ वर्षांच्या 'मोगचो अंडो' चा ऐतिहासिक उत्सव

यंदाचा चित्रपट महोत्सव 'मोगचो अंडो' या गोव्याच्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष रूपात साजरा होत आहे. या महोत्सवामध्ये २०१८ ते २०२३ या कालावधीतील निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत. माकिनेझ पॅलेस थिएटर आणि आयनॉक्स, पणजी येथे या चित्रपटांचे प्रदर्शन होईल. एकूण १९ कथापट (feature films) आणि ४ लघुपट (non-feature films) विविध पुरस्कारांसाठी चुरशीची स्पर्धा करतील.

भरघोस पुरस्कार आणि स्पर्धांचे स्वरूप

या महोत्सवात एकूण २१ कथापट पुरस्कार आणि ७ लघुपट पुरस्कार दिले जातील. कोंकणी आणि मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र पुरस्कार श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत, तर लघुपटांसाठी एकच संयुक्त श्रेणी आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ५ लाख रुपयांचे पहिले पारितोषिक तर दुसऱ्या क्रमांकासाठी ३ लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, छायाचित्रकार, संगीत दिग्दर्शक अशा विविध श्रेणींमध्ये विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.

कार्यशाळा, चर्चासत्र आणि कलाकारांची उपस्थिती

चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यशाळा आणि मास्टरक्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे. यात नीलाभ कौल, पंकज सक्सेना, ज्येष्ठ अभिनेते कंवरजीत पेंटल आणि मार्शल आर्ट्स एक्सपर्ट चित्ता यज्ञेश शेट्टी यांच्यासारखे मान्यवर मार्गदर्शन करतील. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी '४८ अवर्स शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन' मधील विजेत्यांची नावे जाहीर केली जातील.

उद्घाटन सोहळ्याला गायक जॉली मुखर्जी, मुकेश घाटवळ आणि विनोदी कलाकार सागर कारंडे व अंकुर वाडवे यांच्या कलाकृतींचाही आनंद घेता येईल. यासोबतच, आयनॉक्सच्या आवारात १४ ते १७ ऑगस्टदरम्यान फूड कोर्ट आणि हस्तकला प्रदर्शन स्टॉल्सही उपलब्ध असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vote Chori: गोव्यात सापडले नेपाळी मतदार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांचा Ground Survey

Asia Cup 2025: संजू सॅमसन नाही, KL राहुल नाही; आशिया कपबाबत मोठी बातमी, माजी खेळाडूने केला खुलासा

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: 'गोविंदा रे गोपाळा..!'. डिचोलीतील विविध शाळांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी

SCROLL FOR NEXT