Goa Election Commission Dainik Gomantak
गोवा

मडगाव, मुरगाव, काकोड्यात प्रत्‍येकी 2 प्रभाग वाढले ; 2011च्या जनगणनेनुसार नगरसेवकांची संख्या निश्चित, 4 ठिकाणी एक वॉर्ड वाढला

Goa Election Commission: राज्य निवडणूक आयोगाने २०११च्या जनगणनेनुसार संबंधित नगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या लक्षात घेऊन नगरसेवकांची संख्या निश्चित केली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्य निवडणूक आयोगाने २०११च्या जनगणनेनुसार संबंधित नगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या लक्षात घेऊन नगरसेवकांची संख्या निश्चित केली आहे. त्यानुसार मडगाव, मुरगाव, काकोड्यात प्रत्‍येकी दोन; तर डिचोली, कुंकळ्ळी, केपे, काणकोण येथे प्रत्‍येकी एक प्रभाग वाढला. मुरगाव आणि मडगाव नगरपालिका परिषदांमध्ये प्रत्येकी २७ नगरसेवक असतील. तर म्हापसा नगरपालिकेत २०, कुडचडे-काकोडा येथे १७, डिचोली आणि कुंकळ्ळी येथे प्रत्येकी १५ नगरसेवक असतील. केपे येथे १४, काणकोण येथे १३ तर वाळपई, पेडणे आणि सांगे नगरपालिका परिषदांमध्ये प्रत्येकी १० नगरसेवक असणार आहेत.

गोवा राज्य निवडणूक आयोगाने आगामी ११ नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आदेश जारी करत नगरपालिकांतील नगरसेवकांची संख्या, प्रभागरचना तसेच निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त मेनिनो डिसोझा आज असाधारण राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतून ही माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक नगरपालिका क्षेत्रासाठी प्रभागांची संख्या देखील निश्चित केली आहे. नगरसेवकांच्या संख्येइतकेच प्रभाग संबंधित नगरपालिकांमध्ये असतील.

त्यामुळे मुरगाव व मडगावमध्ये २७, म्हापशात २०, कुडचडे-काकोडा येथे १७, डिचोली व कुंकळ्ळीत १५, केपेत १४, काणकोणात १३ तर वाळपई, पेडणे आणि सांगे येथे प्रत्येकी १० प्रभाग असणार आहेत.

अधिकाऱ्यांची नियुक्‍ती

नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आता प्रभागरचना प्रक्रियेलाही अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. गोवा नगरपालिका कायदा १९६८ अंतर्गत राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक नगरपालिका क्षेत्राचे प्रभागांमध्ये विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी विविध तालुक्यांतील उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांची निवडणूक नोंदणी अधिकारी आणि साहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पेडणे नगरपालिकेसाठी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पेडणे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मामलेदार पेडणे हे सहायक निवडणूक अधिकारी असतील. डिचोलीसाठी उपजिल्हाधिकारी डिचोली, म्हापशासाठी उपजिल्हाधिकारी-१ म्हापसा, वाळपईसाठी उपजिल्हाधिकारी सत्तरी, मुरगावसाठी उपविभागीय अधिकारी मुरगाव, मडगावसाठी उपजिल्हाधिकारी-१ सासष्टी, कुंकळ्ळीसाठी उपजिल्हाधिकारी-२ सासष्टी, केपे आणि कुडचडे-काकोडासाठी उपविभागीय अधिकारी केपे, काणकोणासाठी उपविभागीय अधिकारी काणकोण तर सांगेसाठी उपविभागीय अधिकारी सांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित तालुक्यांचे मामलेदार अथवा संयुक्त मामलेदार सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहतील. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने बार्देश तालुक्यातील हडफडे-नागोवा पंचायत प्रभाग क्रमांक ३ आणि धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डे पंचायत प्रभाग क्रमांक ७ साठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने उठविण्यात आल्याची घोषणाही केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT