Goa Political Election: गोव्यात भाजप 30 पेक्षा अधिक जागा जिंकेल! केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सामाजिक योजनांचा घेतला आढावा

Goa Assembly Elections: केंद्रातील मोदी सरकार आणि राज्‍यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या नेतृत्‍वाखालील भाजप सरकार गोव्‍याचा सर्वांगीण विकास साधत आहे.
Union Minister Ramdas Athawale during Goa political event
Union Minister Ramdas Athawale during Goa political eventDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रातील मोदी सरकार आणि राज्‍यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या नेतृत्‍वाखालील भाजप सरकार गोव्‍याचा सर्वांगीण विकास साधत आहे. त्‍यामुळे २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीत भाजप ३० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्‍‍वास केंद्रीय सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री रामदास आठवले यांनी व्‍यक्त केला.

पर्वरी येथील सचिवालयात समाजकल्‍याण खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्‍या बैठकीनंतर घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. केंद्र सरकारच्‍या विविध योजनांची गोव्‍यात यशस्‍वीरीत्‍या अंमलबजावणी होत आहे. राज्‍यात प्रधानमंत्री जनधन योजनेची २.३२ लाख खाती आहेत. केंद्र सरकारच्‍या प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा ४.१५ लाख जणांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे.

Union Minister Ramdas Athawale during Goa political event
Colvale Central Jail: अमली पदार्थ, मोबाईल तस्करी, कैद्यांमध्ये हाणामारी; गोव्यातील मध्यवर्ती कारागृहात अंदाधुंद कारभार

उज्ज्‍वला योजनेअंतर्गत दोन हजारपेक्षा अधिक घरांना गॅस सिलिंडरच्‍या जोडण्‍या देण्‍यात आलेल्‍या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (अर्बन) ३,२०० जणांना घरे बांधून देण्‍यात आलेली आहेत. दिव्‍यांगांसाठीच्‍या योजनांचीही राज्‍यात अंमलबजावणी होत आहे. अधिकाधिक गोमंतकीयांनी केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या सर्व योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी, असे त्‍यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com