CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोवा राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था बनतील 'नॅक मानांकीत'

CM Pramod Sawant: नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत जागतिक ज्ञानसत्ता बनेल.

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जोरात सुरू असून राज्य त्यामध्ये प्रगतिपथावर आहे. 2023 पासून नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचा वेग आणखीन वाढेल. या शैक्षणिक धोरणामुळे भारत जागतिक ज्ञानसत्ता बनेल. कारण हे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण केवळ धोरण नसून तो दूरदर्शी दस्तावेज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री व जीएसएचईसीचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

आल्तिनो येथे आयोजित गोवा राज्य उच्च शिक्षण परिषदेच्या (जीएसएचईसी) बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिक्षण खात्याचे सचिव सरप्रीत गील, शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल मेनन व विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, की राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्था नॅक मानांकीत होतील. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात राज्य देशातील इतर राज्यातील शैक्षणिक संस्थांसाठी आदर्शवत ठरेल. राष्ट्रीय स्तरावर प्रस्तावित नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या धर्तीवर गोवा हे वैधानिक कायद्याद्वारे गोवा राज्य संशोधन प्रतिष्ठान स्थापन करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

जीएसएचईसीचे असे असतील उपक्रम

  • नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी सर्व एचईआय या एकाच युनिफाईड माहिती प्रणालीवर शैक्षणिक व्यवस्थापन आणले जात आहे.

  • एकल राज्य शिष्यवृत्ती पोर्टल विकसित केले जात आहे. विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील.

  • इंडस्ट्री-इंटर्नशिप पोर्टल विद्यार्थ्यांना एकाच पोर्टलद्वारे त्यांची इटर्नशिप निवडण्याची परवानी देईल. इंटर्नशिप आता नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

IND vs WI: स्वातंत्र्य दिनी किंग कोहलीचा धमाका! वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकलं दमदार शतक; टीम इंडियासाठी '15 ऑगस्ट' लय खास

Cricketer Death: क्रिडाविश्वात खळबळ, 138 विकेट्स आणि 2000+ धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूचं निधन

मंत्री सुदीन ढवळीकर म्हणतात, 'गोव्यात मराठी राजभाषा होणे कठीण'

SCROLL FOR NEXT