Goa Tourism News: अमेरिकन पर्यटकांना टॅक्सी चालकांनी अडवणूक केल्याची घटना मुरगाव बंदरावर बुधवारी (दि.14) घडली. जवळपास 80 अमेरिकन पर्यटकांना बसने प्रवास करण्यास रोखून त्यांना टॅक्सीने प्रवास करण्याची सक्ती केली जात होती. यावरून राज्य सरकारने देखील सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत. दोन टॅक्सी चालकांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. दरम्यान, जे क्रुझ या पर्यटकांना गोव्यात घेऊन आले त्या क्रुझने धक्कादायक निर्णय घेतला असून, याचा गोव्याच्या पर्यटन खात्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकन पर्यटकांना ओशन ओडिसी हे क्रुझ गोव्यात घेऊन आले. मुरगाब बंदरावर पोहोचल्यानंतर पर्यटकांसोबत झालेल्या गैरवर्तनावरून या क्रुझने आता मोठा निर्णय घेतला आहे. ओशन ओडिसी क्रुझने गोव्यात पुन्हा येणार नाही असा निर्णय घेतला आहे. अशी माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे गोव्याच्या पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन राज्य असलेल्या गोव्याला मोठा तोटा सहन करावा लागला होता. यावर्षी पर्यटन हंगामाने वेग धरला असताना, मुरगाव येथे घडलेल्या घटनेचे नकारत्मक पडसाद उमटताना दिसत आहेत.
याशिवाय, मुरगाव बंदरावर घटनेमुळे फ्रान्सच्या पर्यटकांना घेऊन गोव्यात येणारी तीन क्रुझ जहाजे रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्यातील टुर ऑपरेटर्सनी भीती व्यक्त केली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत राज्य सरकार दक्ष झाले असून, त्यांना यापुढे असा प्रकार घडल्यास टॅक्सी चालकांचे थेट परवाने रद्द केले जाणार असल्याचे म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.