Goa School Reopening Dainik Gomantak
गोवा

Goa School Reopening: गोव्यातील शाळांच्या वेळेत आणि सुट्ट्यांमध्ये मोठा बदल? शिक्षण विभागाचा 'हा' नवा प्लॅन विचाराधीन!

SCERT Goa Notification: यंदापासून पूर्वीप्रमाणेच जूनमधूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: नवीन शैक्षणिक धोरणानुसार मागील दोन वर्षे एप्रिल महिन्यात इयत्ता सहावी ते बारावीच्या (अकरावी वगळता) शैक्षणिक वर्षाला एप्रिलमध्ये सुरवात केली जायची; परंतु यंदापासून पूर्वीप्रमाणेच जूनमधूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.

याबाबत मात्र अजून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी सांगितले.

शेटगावकर म्हणाल्या की, मागील दोन वर्षे ‘एनईपी’नुसार विद्यार्थ्यांसाठी ‘सेतु अभ्यासक्रमा(ब्रीज कोर्स)’चे आयोजन करण्यात येत होते, ते पुढील वर्षांपासून असणार नाही. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष जूनमधून सुरू करत असताना शाळांचे तास वाढवावे लागणार का? असे अनेक प्रश्‍न आहेत. यासंबंधी शिक्षणतज्ज्ञ, शाळांचे मुख्याध्यापक आदींशी चर्चा करूनच नंतर निर्णय घेण्यात येईल.

पंधरा दिवसांत पुस्तके!

माध्यमिक विद्यालयांना पाठ्यपुस्तके एप्रिल महिन्यात पुरविण्यात आली आहेत. आता केवळ प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पुरविणे बाकी आहे. पुढील पंधरा दिवस प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी उजळणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांत राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील. वेळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळावीत याची काळजी घेण्यात आल्याचे शेटगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT