Goa Governor P. S. Sreedharan Pillai’s Dainik Gomantak
गोवा

Lairai Stampede: चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार; राज्यपालांनी व्यक्त केला विश्वास

Lairai Jatrotsav Stampede Case Goa: चेंगराचेंगरीला देवस्थान समिती, पोलिस, प्रशासन, पंचायत तसेच काही बेशिस्त धोंडही जबाबदार असल्याचा निष्कर्ष सत्यशोधन समितीने काढला आहे.

Pramod Yadav

डिचोली : शिरगावच्या जत्रेवेळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बळी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार, असा विश्वास राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केला.

दुर्घटनेसंबंधी सत्यशोधन समितीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करूनच सरकार योग्य ती कारवाई करणार, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला. राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी आज (गुरुवारी) दुपारी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचे दर्शन घेतले.

राज्यपालांचे शिरगावात आगमन होताच देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी राज्यपालांच्या सहचारिणी डॉ. रिटा, आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह विविध सरकारी अधिकारी उपस्थित होते. राज्यपालांकडून देवस्थानला ५० हजार रुपयांची देणगीही देण्यात आली. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, झेडपी महेश सावंत, शिरगावसह विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य उपस्थित होते.

दरम्यान, चेंगराचेंगरीला देवस्थान समिती, पोलिस, प्रशासन, पंचायत तसेच काही बेशिस्त धोंडही जबाबदार असल्याचा निष्कर्ष सत्यशोधन समितीने काढला आहे. आठ सरकारी अधिकाऱ्यांना याप्रकरणी कारवाई का करू नये, अशा कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.

भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. शिरगावच्या त्या रस्‍त्यावरील चढण कापून काढण्यात येईल आणि रस्ता रूंद केला जाईल. विशिष्ट वेळी तो रस्ता केवळ धोंडांसाठीच उपलब्ध केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT