Lairai Temple: श्री देवी लईराई देवस्थान समितीचा मोठा निर्णय, आता धोंडगणांची होणार नोंदणी; पासपोर्ट फोटो अन् ओळखपत्र अनिवार्य

Dhongdgan Registration Rules: लईराई देवस्थान समितीने एक नोटीस जारी धोंडगणांनाच्या नोंदणीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला. समितीने स्पष्ट केले की, देवी लईराईच्या धोंडगणांनी नोंदणीसाठी दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि ओळखपत्र देवस्थान समितीकडे शक्य तितक्या लवकर सादर करावे.
Dhongdgan Registration Rules
Dainik Gomantak
Published on
Updated on

श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने अवघे राज्य ढवळून निघाले. घटनेवरुन विरोधकांनी सावंत सरकारला धारेवर धरले. सरकार जत्रोत्सावाचे नियोजन करण्यात कमी पडल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. तसेच, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तथ्य शोधक समितीने सादर केलेल्या अहवालात उत्तर गोव्याचे माजी पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि माजी जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते यांच्यासह अनेकांना दुर्घटनेसाठी जबाबदार धरले. याच पार्श्वभूमीवर आता लईराई देवस्थान समितीने तातडीची नोटीस जारी करत एक मोठा निर्णय घेतला.

देवस्थान समितीकडून तातडीची नोटीस जारी

दरम्यान, लईराई देवस्थान समितीने एक नोटीस जारी धोंडगणांनाच्या नोंदणीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला. समितीने स्पष्ट केले की, देवी लईराईच्या धोंडगणांनी नोंदणीसाठी दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि ओळखपत्र देवस्थान समितीकडे शक्य तितक्या लवकर सादर करावे. चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर समितीकडून हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Dhongdgan Registration Rules
Shri Lairai Temple: श्री लईराई देवीचा 'राज्योत्सव' म्हणजे शासन नेमके काय करणार? सरकारीकरणाच्या शंकेतून होणारा विरोध

चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना

शिरगाव येथे पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा लोकांचा मृत्यू तर 74 जण जखमी झाले होते. मृतांमध्ये दोन महिला आणि एका 16 वर्षीय मुलाचा समावेश होता. 5 मे पासून सुरु झालेल्या पाच दिवसांच्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी ही दुर्घटना घडली होती. जखमींपैकी काहीजण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. या अहवालामुळे आता प्रशासकीय पातळीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com