AI For Stamp Duty in Goa:  Dainik Gomantak
गोवा

Goa Stamp Duty: गोव्यात मुद्रांक शुल्कासाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर

प्रत्येक सर्व्हे नंबरसाठी बाजारभाव अपलोड करणार सरकार

Akshay Nirmale

AI For Stamp Duty in Goa: गोवा राज्य सरकारने आपल्या सब-रजिस्ट्रार पोर्टलवर जमिनींचे बाजारभाव अपलोड करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे ज्यांना सेल डीड करायचे आहे त्यांच्यासाठी मुद्रांक शुल्क म्हणून जी रक्कम भरावी लागेल, ती आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे आपोआप कळेल. कायदा मंत्री नीलेश काब्राल यांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काब्राल म्हणाले की, सध्या जनतेला सेल डीडच्या कामांत करण्यासाठी काही अडचणी येतात. सरकार प्रत्येक सर्व्हे नंबरसाठी बाजारभाव अपलोड करेल. सध्या मुद्रांक शुल्क वसुलीत महसूल आणि कायदा असे दोन विभाग कार्यरत आहेत. जमिनीची किंमत मात्र महसूल विभाग ठरवते.

काब्राल म्हणाले की, काही प्रकरणांमध्ये, जमिनीची किंमत ठरवण्यासाठी विक्रीची कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावी लागतात. महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात आणि मी सरकार-निर्दिष्ट जमिनींची किंमत अपलोड करण्यासाठी काम करत आहोत.

कायदा विभागाची भूमिका कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकसित करण्याची आहे आणि महसूल विभागाच्या शिफारशींच्या आधारे दर दरवर्षी आपोआप ते बदलले जाईल.

काब्राल यांनी असेही सांगितले की यामुळे विक्रीची कामे करण्यात मानवी हस्तक्षेप कमी होईल. पंजाब, मणिपूर आणि अंदमान आणि निकोबार नंतर, गोवा हे राष्ट्रीय जेनेरिक दस्तऐवज नोंदणी प्रणाली (NGDRS) स्वीकारणारे चौथे राज्य असणार आहे.

एनजीडीआरएस केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत NIC द्वारे विकसित केले गेले आहे आणि देशभरात 40 कोटी रुपये खर्चून लागू केले जात आहे.

गोव्यात व्यवसाय सुलभता यावी हे या प्रणालीचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी कागदपत्रे अपलोड केल्याने त्यांना अनुक्रमांक मिळतात, त्यामुळे त्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर सेवा दिली जाऊ शकते.

एनजीडीआरएस प्रथम केपे तालुक्यात सुरू करण्यात आली आणि नंतर सर्व 12 तालुका उपनिबंधक कार्यालयांमध्ये सुरू करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT