ST Reservation Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्याआधीपासूनच सुरु - CM सावंत

ST Reservation: केंद्र सरकारही याबाबत सकारात्मक - सावंत

Ganeshprasad Gogate

ST Reservation: 2027 च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीपासूनच सुरु होईल अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच केंद्र सरकार याबाबत सकारात्मक असल्याचेही सावंत यांनी सांगितले आहे.

विशेष म्हणजे विधानसभेत आदिवासींना राजकीय आरक्षण देण्यासाठी सरकारने पावले उचलली असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली 16 फेब्रुवारीला दिल्लीत केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ गेले होते.

त्यावेळी आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी मतदारसंघ फेररचना आयोग स्थापन करावा आणि राज्यातील गावडा, कुणबी आणि वेळीप या जमातींना आदिवासी म्हणून विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्याची मागणी केंद्रीय आदिवासी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा यांच्यासमोर सादर करण्यात आली.

तसेच मुंडा यांच्यासमोर 2011 ची जनगणना गृहीत धरून मतदारसंघ फेररचना आयोग नेमण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

त्यांनी याविषयी मंत्रालयाकडून योग्य ती कार्यवाही करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

तसेच 2026 सालची जनगणना मतदारसंघ फेररचनेसाठी ग्राह्य धरली गेली, तर 2027 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आदिवासी समाजाला आरक्षण मिळणार नसल्याची भीती चर्चेवेळी व्यक्त झाली होती.

प्रामुख्याने हा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील असल्याने अमित शहा यांची भेट घेण्यात येणार होती.

गोव्यातील एसटींच्या शिष्टमंडळाला गृहमंत्री अमित शहा भेटलेच नाहीत!

गृहमंत्री अमित शहांना भेटून गोवा विधानसभेत एसटींच्या राजकीय आरक्षणाबाबतची प्रक्रिया गतिमान करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी विनंती केली.

त्यावेळी शहांकडून तोगडा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र शेवटच्या क्षणी अत्यावश्यकतेमुळे पूर्ण शिष्टमंडळ बैठकीमध्ये ते सहभागी होऊ शकले नाही.

त्यामुळे गृहमंत्री पुढील प्रसंगी भेटतील अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT