Goa ST Political Reservation Dainik Gomantak
गोवा

Goa ST Political Reservation: 'केंद्र सरकार लवकरच तोडगा काढणार'! 13 ऑगस्टच्या 'चलो पणजी' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CM सावंतांचं मोठं वक्तव्य

Pramod Sawant ST Reservation: एसटी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या उटा संघटना आक्रमक झाली आहे आणि त्यांनी १३ ऑगस्ट रोजी ‘चलो पणजी’ची हाक दिली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यातील अनुसूचित जमातीच्या (एसटी) बांधवांच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नावर शक्य तेवढ्या लवकर केंद्र सरकार तोडगा काढेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

एसटी समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या उटा संघटना आक्रमक झाली आहे आणि त्यांनी १३ ऑगस्ट रोजी ‘चलो पणजी’ची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री सावंत म्हणाले, एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळायला हवे.

राज्यातील गावडा, कुणबी, वेळीप असे एसटी बांधव अनेक वर्षांपासून राजकीय आरक्षणाची मागणी करीत आहेत, ती योग्य आहे. आम्ही हा विषय दिल्लीत पोहोचवला आहे. केंद्रीय नेत्यांनी या विषयाची दखल घेतलेली आहे. त्याविषयी सध्या कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या जात आहेत.

१५ दिवसांत प्रश्न सुटणार : मंत्री तवडकर

उटाच्या आंदोलनातील सक्रिय नेते आणि राज्य सरकारातील मंत्री रमेश तवडकर यांनी विश्वास व्यक्त केला की, अनुसूचित जमातींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न पुढील १५ दिवसांत पूर्णपणे सोडवला जाईल. आपण या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत असून, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे या विषयावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असे त्यांनी सांगितले.

१५ ऑगस्टपर्यंत पुनर्विचार करू!:

केंद्र सरकारने प्रस्ताव फेटाळल्यानंतर, धनगर समाजाने अनुसूचित जमातीचा दर्जा मिळण्याच्या अनेक दशकांपासूनच्या मागणीचा पुन्हा एकदा आग्रह धरला आहे. बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन, राज्य सरकारने या प्रकरणाचा पाठपुरावा करावा, अशी विनंती केली. यावर १५ ऑगस्टपर्यंत पुनर्विचार केला जाईल, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT