St Francis Xavier’s  Dainik Gomantak
गोवा

St Francis Xavier’s: पोप फ्रान्सिस निमंत्रणाच्या निर्णयाचे आ. रुडाल्फ यांच्याकडून स्वागत; म्हणाले पोप गोव्यात येणे म्हणजे...

St Francis Xavier’s Goa: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे पोप यांना भारतात येण्याचे निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.

Ganeshprasad Gogate

St Francis Xavier’s Goa: गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनासाठी ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना निमंत्रित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचे सांताक्रूझ मतदारसंघातील ख्रिस्ती बांधवांच्यावतीने आम्ही स्वागत करीत आहोत. पोप गोव्यात येणे ही राज्यातील ख्रिस्ती बांधवांसाठी निश्‍चित अभिमानाची बाब ठरेल, असे मत आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी व्यक्त केले.

निवासस्थानी शनिवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सांताक्रूझ मतदारसंघातील त्यांचे सहकारी पंचसदस्य उपस्थित होते.

रुडाल्फ म्हणाले, जुने गोवा येथील सेंट फ्रान्सिस यांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे पोप यांना भारतात येण्याचे निमंत्रण पाठवण्यात येणार आहे, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असून आपण मुख्यमंत्र्यांचे विशेषतः याबाबत आभार मानत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT