Goa ST Reservation Dainik Gomantak
गोवा

गाेव्‍यातील अनुसूचित जमातींना न्‍याय मिळण्‍याची वाट मोकळी; अँथनी बार्बोझाकडून विधेयकाचे स्वागत

Goa ST Reservation: गोव्‍यातील एसटीसाठी अत्‍यंत महत्‍वाचा दिवस आहे असे मत बार्बोझा यांनी व्‍यक्‍त केले.

Pramod Yadav

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी आज (05 ऑगस्ट) लोकसभेत गोवा विधानसभेत एसटी समाजासाठी जागा आरक्षित करण्‍यासाठीचे विधेयक मांडल्‍याबद्दल गोव्‍यातील भाजप एसटी मोर्चाचे उपाध्‍यक्ष अँथनी बार्बोझा यांनी त्‍याचे स्‍वागत केले असून गोव्‍यातील अनुसूचित जमातींना न्‍याय मिळण्‍याची वाट आता मोकळी झाली आहे अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली.

यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे अध्‍यक्ष जे. पी. नड्डा हे अभिनंदनास पात्र आहेत असे त्‍यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

गोव्‍यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे ही दीर्घ काळाची मागणी असून ही मागणी भाजप सरकारच पूर्ण करेल याची आम्‍हाला खात्री हाेती. लोकसभेच्‍या पहिल्‍याच अधिवेशनात केंद्रीय कायदा मंत्र्‍यांनी हे विधेयक मांडून गोव्‍यातील एसटींना भाजप सरकारने जे आश्र्‍वासन दिले होते त्‍याची पूर्तता केली आहे.

आज गोव्‍यात नेव्‍हीस सायबिणीचे फेस्‍त असून या पवित्र दिनी आमची मागणी पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने जे पाऊल घातले आहे त्‍याला देवाचाही आशिर्वाद असेल असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

यापूर्वी आपण स्‍वत: कित्‍येकवेळा केंद्र सरकार आमची ही मागणी पूर्ण करणार असे सांगत आलो हाेतो. आज माझे शद्ब खरे ठरत आहेत याचा मला आनंद वाटतो. गोव्‍यातील एसटी समाजाचा हा प्रश्र्‍न केंद्राकडे लावून धरलेले मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत आणि हे विधेयक केंद्रात यावे यासाठी वेगवेगळ्‍या व्‍यासपीठावरुन प्रयत्‍न केलेले सभापती रमेश तवडकर हेही अभिनंदनास पात्र आहेत.

आजचा दिवस हा गोव्‍यातील एसटीसाठी अत्‍यंत महत्‍वाचा दिवस आहे असे मत बार्बोझा यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT