Goa SSC Exam Result Dainik Gomantak
गोवा

गोव्यात दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

एकत्रित निकालपत्रिका 3 जूनपासून उपलब्ध होणार असल्याची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा शालांत मंडळाचा दहावीचा निकाल उद्या 1 जून रोजी संध्याकाळी 5.30 वा. जाहीर होणार आहे. एकत्रित निकालपत्रिका 3 जून रोजी सकाळी 9 वाजल्यापासून शाळेच्या लॉगिनवरून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकालाची प्रत उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी दिली. (Goa SSC Exam Result)

दहावीची परीक्षा 31 परीक्षा केंद्र व 173 उपकेंद्रावर घेण्यात आली होती. परीक्षेला एकूण 20,572 मुले बसली होती. त्यामध्ये 10,530 मुले तर 10,042 मुलींचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं चित्र होतं. आता दहावीच्या निकालातही तशीच पुनरावृत्ती होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 92.66 टक्के लागला. यंदाही बारावीच्या परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली असून 94.58 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90.66 टक्के आहे. शिक्षण मंडळाने यंदा बारावीची परीक्षा दोन सत्रांत 18 केंद्र आणि 72 उपकेंद्रांवर घेतली होती. यासाठी राज्यभरातून 18 हजार 201 विद्यार्थी बसले होते. यापैकी कला शाखेमध्ये 4 हजार 754, वाणिज्य शाखेत 5 हजार 496, विज्ञान शाखेत 5 हजार 77 तर व्यावसायिक शाखेमध्ये 2 हजार 874 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT