Goa Board SSC results 2025 Dainik Gomantak
गोवा

Goa SSC Result: दहावीच्या निकालाचा दिवस ठरला! येथे पाहा ऑनलाईन निकाल

Goa SSC Result Date And Time: यावर्षी एकूण १८,८३८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यात ९,२८० मुले आणि ९,५५८ मुली होत्या.

Pramod Yadav

Goa SSC Result Date And Time

पणजी: गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी (०७ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परिपत्रक काढून दिली आहे.

पर्वरीतील गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन निकालाची घोषणा करण्यात येणार आहे. यावर्षी १ ते २१ मार्च २०२५ या काळात दहावीच्या परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ३२ केंद्रावर घेण्यात आलेल्या या परीक्षेला १८,८३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यात ९,२८० मुले आणि ९,५५८ मुलींचा समावेश आहे.

येथे पाहा ऑनलाईन निकाल

विद्यार्थ्यांना www.gbshse.in, results.gbshsegoa.net या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. निकालाची प्रत्र शाळांना service1.gbshse.in या संकेतस्थळावरुन ०९ एप्रिलपासून डाऊनलोड करता येणार आहे.

गेल्यावर्षी गोव्यात १८,९१४ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी १७,४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९२.३८ टक्के एवढा लागला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT