Vedanta- Sesa Goa Dainik Gomantak
गोवा

Vedanta- Sesa Goa तर्फे व्हेटरन्स, यूथ गटात फुटबॉल स्पर्धा, जाणून स्पर्धेची तारिख

वेदांता सेझा-अवेसचा उपक्रम: राज्यात व्हेटरन्स, यूथ गटात फुटबॉल स्पर्धा

किशोर पेटकर

Vedanta- Sesa Goa राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटूंची काळजी घेण्यासाठी ‘असोसिएशन फॉर द वेलबिईंग ऑफ एल्डर स्पोर्टसपर्सन्स’ (अवेस) संघटना गेली काही वर्षे सातत्याने कार्यरत आहे.

त्यांनी आता ‘वेदांता-सेझा’च्या सहकार्याने ज्येष्ठांच्या कल्याणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात युवा विकासाचाही विडा उचलला असून त्यांच्यातर्फे व्हेटरन्स, तसेच 15 वर्षांखालील मुलगे व मुलींसाठी फुटबॉल स्पर्धा घेण्यात येईल.

अवेस-सेझा वेदांता यांच्यातर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत फुटबॉल स्पर्धा आयोजनाची माहिती देण्यात आली. यावेळी स्पर्धेतील संघांची गटवारी आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आले.

त्यावेळी भारताचे माजी फुटबॉल कर्णधार ‘पद्मश्री’ ब्रह्मानंद शंखवाळकर, गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस, ‘अवेस’ संस्थापक पदाधिकारी आल्बर्ट कुलासो, सेझा गोवाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन जाजू, लीना वेरेकर, तसेच ‘अवेस’चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

व्हेटरन्स वयोगटातील स्पर्धा २४ सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल. या स्पर्धेत चिंचोणे, बार्देश, तिसवाडी, चांदर, वास्को, मुरिदा-फातोर्डा, कळंगुट व नावेली हे संघ आहेत.

15 वर्षांखालील मुलींची स्पर्धा 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीत होईल आणि एफसी म्हार्दोळ, प्रोग्रेस, कम्पेशन, सिकेरी एफसी या संघांत चुरस असेल. 15 वर्षांखालील मुलांची यूथ कप स्पर्धा 30 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत आठ संघांत खेळली जाईल.

या स्पर्धेत साऊथ गोवा युनायटेड, साळगावकर एफसी, धेंपो स्पोर्टस क्लब, सेझा फुटबॉल अकादमी, एफसी गोवा या राज्यातील पाच संघांसमवेत बंगळूर एफसी, जमशेदपूर एफसी, बेळगाव युनायटेड या बाहेरगावच्या तीन संघांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa TET 2025: सुवर्णसंधी! शिक्षक होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा 'टीईटी'चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Ola Electric Sales Goa: ओला कंपनीला मोठा झटका; गोव्यात इलेक्ट्रिक बाईकची विक्री थांबवली

Mohammad Azharuddin: क्रिकेटचा कॅप्टन आता राज्याचा मंत्री! मोहम्मद अझरुद्दीन यांची तेलंगणा मंत्रिमंडळात नवी इनिंग

Pratapgad Fort : 1656 मध्ये जावळी जिंकले, शिवरायांनी किल्ला बांधण्याची आज्ञा दिली; पराक्रमाची गाथा सांगणारा 'प्रतापगड'

Womens World Cup 2025 Final : टीम इंडिया की आफ्रिका? अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर विजेता कोण? काय सांगतो आयसीसीचा नियम? वाचा

SCROLL FOR NEXT