UTT Para Table Tennis
UTT Para Table Tennis  Dainik Gomantak
गोवा

UTT Para Table Tennis : टेबल टेनिसमध्ये लॉईडला सुवर्णपदक

किशोर पेटकर

UTT Para Table Tennis Tournament: यूटीटी पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत गोव्याच्या लॉईड फर्नांडिस याने गट २ मध्ये सुवर्णपदक जिंकले, तर गट ९ मध्ये चेतन साळगावकर याला ब्राँझपदक प्राप्त झाले.

पॅरा टेबल टेनिस असोसिएशन आणि मध्य प्रदेश टेबल टेनिस संघटनेने भारतीय पॅरा टेबल टेनिस महासंघाच्या मान्यतेने घेतलेली स्पर्धा इंदूर येथे झाली.

लॉईड याने अंतिम लढतीत तमिळनाडूच्या अविनाश गोपिनाथ याच्यावर ३-० फरकाने मात केली.

गतवर्षी नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येही लॉईडने गट २ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

तेव्हाही त्याने अंतिम लढतीत अविनाश याच्यावर ३-० फरकानेच विजय नोंदविला होता. लॉईडने २०२२ मध्ये इंदूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत गट तीनमधील व्हिअलचेअर प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले.

त्यानंतर पॅरा स्पर्धा निकषांनुसार तो गट दोनमध्ये दाखल झाला. गतवर्षी जुलैमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस मानांकन स्पर्धेत लॉईडने सुवर्णपदक पटकावले.

चुरशीच्या लढतीत चेतन याला उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या दत्ता याच्याकडून १-३ फरकाने हार पत्करावी लागली. त्यामुळे त्याला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

चेतन याने पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समध्येही पॅरा टेबल टेनिसच्या गट ९ मध्ये ब्राँझपदक जिंकले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

SCROLL FOR NEXT