Star Contender Table Tennis Dainik Gomantak
गोवा

Star Contender Table Tennis: मानव-मानुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत

Star Contender Table Tennis: महिला दुहेरीत तनिषा कोटेचा-सायली वाणीही विजयी

किशोर पेटकर

Star Contender Table Tennis: भारताच्या मानव ठक्कर व मानुष शाह याने डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर 2024 टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांच्या दुहेरीत तनिषा कोटेचा व सायली वाणीही यांनी विजयी कूच राखली.

स्पर्धा पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात सुरू आहे. एकेरीत श्रीजा अकुला, अर्चना कामत यांनी महिला एकेरीत विजय नोंदविले.

पुरुष दुहेरीत गुजरातच्या मानव व मानुष जोडीने इंडोनेशियाच्या पँग येव एन कोएन व अवतार क्वेक इझाक जोडीला ३-० (११-७, ११-९, ११-५) असे हरवून बाद फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्राच्या तनिषा व सायली जोडीने चुरशीच्या लढतीत विजय नोंदवून अखेरच्या आठ जोडींच्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी स्वीडनच्या ख्रिस्तिना कॉलबर्ग व फिलिपा बेर्गां जोडीला ३-१ (११-९, ४-११, ११-८, ११-७) असे नमविले. भारतीय महिला जोडीसमोर उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या जिओन जिही व शिन युबिन या जोडीचे आव्हान असेल.

महिला एकेरीत आगेकूच राखताना भारताच्या अर्चना कामत हिने स्पेनच्या मारिया झियाओ हिच्यावर ३-० (११-७, १३-११, १२-१०) असा विजय मिळविला. श्रीजा अकुला हिने फ्रान्सच्या कामिली लुत्झ हिला ३-१ (११-५, ९-११, ११-७, ११-८) असे हरविले. श्रीजा पुढील फेरीत इजिप्तच्या हाना गोदा हिच्याविरुद्ध खेळेल.

पुरुष एकेरीत हरमीत देसाई, जीत चंद्रा, तर महिला एकेरीत अंजली रोहिल्ला व पात्रता फेरीतून आलेल्या नित्या मणी या भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT