Inter College Women's Kabaddi Tournament Dainik Gomantak
गोवा

Inter College Women's Kabaddi Tournament: पीईएस महाविद्यालय महिला कबड्डीत विजेते

Inter College Women's Kabaddi Tournament- पीईएस महाविद्यालयाची अभूतपूर्व कामगिरी, अंतिम सामन्यात विजयी

किशोर पेटकर

Inter College Women's Kabaddi Tournament: गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला कबड्डी स्पर्धेत फर्मागुढी-फोंड्याच्या पीईएस एसआरएसएन महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी पर्वरीच्या विद्या प्रबोधिनी महाविद्यालयावर 59-45 गुणफरकाने मात केली.स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झाली.

उपांत्य लढतीत पीईएस एसआरएसएन महाविद्यालयाने काणकोणच्या श्री मल्लिकार्जुन आणि श्री चेतन मंजू देसाई महाविद्यालयास 17-14 गुणफरकाने, तर विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाने साखळी सरकारी महाविद्यालयास 49-28 गुणफरकाने हरविले. पीईएस महाविद्यालयाची अलिशा आकारकर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली.

गोवा विद्यापीठाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमावेल मुर्ती, गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा साहाय्यक संचालक भालचंद्र जदार यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

विजेत्या पीईएस एसआरएसएन महाविद्यालय संघात अलिशा आकारकर, साहिली नाईक, जान्हवी मडकईकर, अनीक्षा वेळीप, स्वाती नाईक, युतिका सतरकर, ईशा गावडे, ऋत्विका बांदोडकर, पंचमी भट, तानिया नाईक, शिया शेट, इंदू गावकर यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT