Women's Under-23 T20 मध्य प्रदेशच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या आक्रमकतेसमोर गोव्याचा संघ शुक्रवारी गारद झाला. टी-२० सामन्यांच्या या स्पर्धेत त्यांच्यावर सलग दुसऱ्या पराभवाची नामुष्की आली.
सिव्हिल लाईन्स-नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर शुक्रवारी मध्य प्रदेशने गोव्याला ५४ धावांनी सहजपणे हरविले. मध्य प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १६५ धावा केल्या, गोव्याला नंतर ९ बाद १११ धावांचीच मजल मारता आली.
मध्य प्रदेशची बॅट्सवूमन अनुष्का शर्मा हिने तुफानी फलंदाजी केली. तिने अवघ्या ६५ चेंडूंत १३ चौकार व ४ षटकारांच्या साह्याने नाबाद १०० धावा केल्या. तिला नाबाद ४५ धावा करून सौम्या तिवारी हिने भक्कम साथ दिली. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची अभेद्य भागीदारी करून संघाला मजबूत धावसंख्या गाठून दिली.
संक्षिप्त धावफलक
मध्य प्रदेश: २० षटकांत २ बाद १६५ (अनुष्का शर्मा नाबाद १००, सौम्या तिवारी नाबाद ४५, मेताली गवंडर ४-०-२४-१, पूर्वा भाईडकर ४-०-३५-०, तनया नाईक ४-०-४४-१, सेजल सातार्डेकर ४-०-२७-०, सिद्धी सवासे २-०-१६-०, पूर्वजा वेर्लेकर २-०-१९-०) वि. वि.
गोवा: २० षटकांत ९ बाद १११ (पूर्वजा वेर्लेकर १२, कंविक्षा रेकडो २, इब्तिसाम शेख ३४, पूर्वा भाईडकर १९, दिव्या नाईक ८, हर्षिता यादव ३, तनया नाईक नाबाद ७, मेताली गवंडर १०, हर्षदा कदम ०, सिद्धी सवासे १, सेजल सातार्डेकर नाबाद १, वैष्णवी शर्मा २७-२, सौम्या तिवारी २२-२, क्रांती गौड १४-२).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.