Goa football  Dainik Gomantak
गोवा

Asian Games: गोमंतकीय फुटबॉलपटूंविना भारतीय संघ

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Football फुटबॉल हा गोव्याचा राज्य खेळ, या खेळात राज्याची ऐतिहासिक परंपरा आहे, मात्र चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या आगामी 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी जाहीर केलेल्या 22 सदस्यीय भारतीय फुटबॉल पुरुष संघात एकाही गोमंतकीय फुटबॉलपटूस स्थान मिळालेले नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पुरुष फुटबॉलमध्ये भारताचा अ गटात यजमान चीन, बांगलादेश व म्यानमार यांच्यासमवेत समावेश आहे. स्पर्धेत एकूण २३ संघ असून त्यांची सहा गटात विभागणी करण्यात आली आहे.

भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत यापूर्वी दोन वेळा विजेतेपद मिळविले आहे, पण यंदा प्रथमच ते नऊ वर्षांनंतर स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेसाठी स्टिमॅक यांनी मंगळवारी संघ घोषित केला. आशियाई स्पर्धा १९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत खेळली जाईल.

जून महिन्यात बंगळूर येथे झालेल्या सॅफ अजिंक्यपद स्पर्धेत भारताने अंतिम लढतीत कुवेतला हरवून विजेतेपद मिळविले होते, तेव्हाची मुख्य संघात गोमंतकीय फुटबॉलपटूस स्थान मिळाले नव्हते. यावरून गोमंतकीय फुटबॉलचा राष्ट्रीय संघ पातळीवर दर्जा घसरत चालल्याचे जाणवते.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात एफसी गोवा संघातर्फे खेळणारा गोलरक्षक धीरजसिंग मोईरांगथेम व यंदा करारबद्ध झालेला बचावपटू संदेश झिंगन या खेळाडूंचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Goa Navratri 2024: नेपाळ ते छत्रपती संभाजीनगर प्रवास, मुघलांच्या भीतीने गोव्यात स्थापन झालेली श्री महालसा देवी

Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

Sunburn Festival 2024: ‘सनबर्न’ इथेच का हवा आहे? दबावामुळे स्थानिक संतप्त; बैठकीसाठी सरसावल्या बाह्या

SCROLL FOR NEXT