Goa Municipality | Margao Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Damodar Shirodkar: सोनसोडो कचरा कामाची पाहणी होणार नियमित

Damodar Shirodkar: गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते

दैनिक गोमन्तक

Margao Municipal Council: मडगाव नगरपालिकेने सोनसोडो कचरा कामाची नियमित पाहणी करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. सोनसोडो कचरा प्रकल्पात नवीन कचेरी खुली केली असून तेथून कामावर लक्ष ठेवण्यात येईल, ही माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

या संदर्भात निरीक्षण करण्यासाठी शुक्रवारी बैठक झाली व त्यात आमदार दिगंबर कामत यांनी मार्गदर्शन केले असे शिरोडकर यांनी सांगितले. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लेविन्सन मार्टीन्स, नगरसेवक उपस्थित होते. या बद्दलची पुढील बैठक 9 डिसेंबर रोजी निश्र्चित करण्यात आली आहे.

सोनसोडो प्रकल्पाच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी व सुरळीत करण्यासाठी अशा नियमित निरीक्षणाची गरज असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. फेब्रुवारी 2023 पर्यंत आम्हांला सोनसोडो येथील कचऱ्याचे बायोरेमेडिएशन पूर्ण करायला हवे. न्यायालयाने पण हीच तारीख दिल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT