Solar Ferryboat Canva
गोवा

Solar Ferryboat: धूळखात पडलेल्या 3 कोटींच्या सौर फेरीबोटीचा होणार लिलाव? सरकारसाठी ठरला तोट्याचा सौदा

Solar electric ferry: सरकारने पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी फेरीबोट बांधण्याचा निर्णय घेतला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Solar ferry Goa

पणजी: राज्य सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये ३ कोटी ९७ लाख रुपये खर्चून बांधून घेतलेली सौर इलेक्ट्रिक हायब्रीड फेरीबोट विकण्याशिवाय आता नदी परिवहन खात्यासमोर पर्याय राहिलेला नाही. केवळ उपचार म्हणून ही फेरीबोट भाड्याने चालवण्यास देण्यासाठी पुन्हा निविदा मागवण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

या फेरीबोटीची प्रवाशी क्षमता ६० आहे. १३ ऑक्टोबर २०२२ रोजी ती आणल्यानंतर चोडण ते पणजी मार्गावर चालवण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. फेरीबोट चालवणे कठीण झाल्याने ती खासगी कंपनीने पर्यटन क्षेत्रात वापरण्यासाठी भाडेपट्टीवर घ्यावी यासाठीही प्रयत्न करण्यात आले.

त्यासाठी मागवलेल्या निविदेला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने, पुन्हा निविदा मागवण्याचे ठरवण्यात आले आहे. अलीकडे बंदर कप्तान खात्याने विनावापर असलेली टगबोट भंगारात विकण्यासाठी जाहिरात दिली त्या धर्तीवर सौर फेरीबोट विकण्याचा विचार केला जाऊ शकतो.

सरकारने पर्यावरणपूरक आणि आधुनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी फेरीबोट बांधण्याचा निर्णय घेतला होता. ही फेरीबोट रोरो सेवेसाठी उपयोगात आणता येईल का, यासाठी केरळमध्ये पाहणी करून नंतर तिची निर्मिती करण्यात आली.

मात्र, प्रत्यक्षात ही फेरीबोट गोवा सरकारच्या नदी परिवहन खात्यासाठी डोकेदुखीच ठरली आहे. अनेक तांत्रिक आणि प्रशासनिक अडचणींमुळे ही बोट धुळखात पडली.

तोट्याचा सौदा

सौरऊर्जेवरील वाहतुकीचा चांगला उपक्रम नियोजनाअभावी अपयशी ठरल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. ही फेरीबोट सरकारसाठी तोट्याचा सौदा ठरली असून, तिला विकण्याचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT