Tugboat: 1.5 कोटी खर्चून आणलेली 'टगबोट' सरकारी गोंधळामुळे गेली गंजून; 7 वर्षे विनावापर, निधीअभावी विकण्याचा निर्णय

Unused Tugboat Goa: बेकायदा रेती काढताना पकडलेल्या होड्या ओढून आणण्यासाठी सरकारने टगबोट घेतली, मात्र विविध खात्यांच्या समन्वयाच्या अभावात ती विनावापर राहून सडली आहे.
Tugboat Goa
TugboatX
Published on
Updated on

पणजी: नद्यांतून बेकायदा रेती काढताना पकडलेल्या होड्या ओढून आणण्यासाठी सरकारने टगबोट घेतली, मात्र विविध खात्यांच्या समन्वयाच्या अभावात ती विनावापर राहून सडली आहे. जलमार्गावरील फेरीबोटी बंद पडल्या तर त्यांच्या मदतीला जाण्यासाठीही या टगबोटीचा वापर करण्याचे प्रस्तावित होते.

बंदर कप्तान खात्याने साळगाव ही टगबोट तब्बल दीड कोटी रुपये खर्चून २०१८ मध्ये खरेदी केली होती. बंदर कप्तान खाते स्वतंत्र खाते आहे, बेकायदा रेती काढण्यात गुंतलेल्या होड्यांवर किनारी पोलिस कारवाई करतात, फेरीबोटी नदी परिवहन खाते चालवते. या तिन्ही खात्यांत समन्वय नसल्याने ती टगबोट पडून राहिली आणि आता ती चक्क भंगारात विकण्याची वेळ सरकारवर आली आहे.

विकत घेतल्यापासून सात वर्षात ही टगबोट विनावापर राहिली आणि आता तिच्या देखभालीसाठी खात्याकडे पुरेसा निधी नसल्याने ती सरळ विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tugboat Goa
Goa Coastal Area: '..तर सुंदर गोवा संकल्पना धुळीस मिळेल'! किनारपट्टी भागासाठी खलपांनी केली ‘रोड मॅप’ची मागणी

ही टगबोट आता "जसे आहे, जेथे आहे, आहे त्या स्थितीत तसेच, कोणतीही तक्रार न करता" या अटीवर विकण्याचा निर्णय घेतला आहे. हे जहाज कोणत्याही प्रकारच्या हमीशिवाय, वॉरंटीसह किंवा कार्यक्षमतेची खात्री न देता विकले जात आहे.

जहाजाच्या विक्रीसंदर्भातील एका दस्तऐवजात बंदर कप्तान खात्याने स्पष्ट केले आहे की, विक्रीनंतर आढळणाऱ्या कोणत्याही दोषांसाठी, दुरुस्तीसाठी किंवा कमतरतेसाठी ते जबाबदार असणार नाही. या टगबोटीला डिझेलवर चालणारी दोन इंजिने आहेत.

Tugboat Goa
Boat Capsized At Calangute: 'कळंगुट' दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे! बोट परवाना निलंबित, दोघांना अटक

अखेर टगबोट आढळली दुरुस्ती यार्डात

ही टगबोट सध्या सांकवाळ येथील एका खासगी जहाज दुरुस्ती यार्डात आहे. तेथूनच ती विकली जाणार आहे. याआधी ती खात्याच्या बिठ्ठोण येथील यार्डात ठेवण्यात आली होती. तेथून ती कुठे हलवली याची नीट माहिती मिळत नसल्याने एका जागरूक नागरिकाने मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर ती टगबोट सांकवाळ येथे असल्याची माहिती उघड झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com