पणजी: नदी परिवहन खात्याच्या मालकीची सौर फेरीबोट यापुढे कोण चालवणार, हे येत्या २४ ऑगस्ट रोजी ठरणार आहे. ही फेरीबोट चालवण्यास देण्यासाठी मागवलेली निविदा त्यादिवशी उघडली जाणार आहे.
खात्याचे संचालक विक्रम राजेभोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार या फेरीबोट विषयावर विधानसभेत चर्चा झाली होती. त्यावेळी सरकारने ही फेरीबोट पर्यटनाला चालना देण्यासाठी चालवण्यास देणार अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार खात्याने ही फेरीबोट चालवण्यास देण्यासाठी निविदा मागवली होती. तीन चार जणांनी या फेरीबोटीविषयी नदी परिवहन खात्याकडे चौकशीही केली आहे. यामुळे ही फेरीबोट चालवण्यास घेण्यासाठी काहीजण इच्छुक असतील असे दिसते, येत्या २४ रोजी निविदा उघडल्यानंतर फेरीबोट कोण चालवेल हे ठरणार आहे.
राज्य सरकारने २०१८ मध्ये केरळमध्ये शिष्टमंडळ पाठवून सौर फेरीबोटींचा अभ्यास केला होता. शिष्टमंडळाच्या अहवालानुसार चोडण ते पणजी मार्गावर ही सौर फेरीबोट चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी या फेरीबोटीचे उद्घाटनहीकरण्यात आले.
ही फेरीबोट बंद ठेवली असताना उंदरांनी तिच्या वायर्स खाल्ल्या होत्या. त्यानंतर ही फेरीबोट चालवण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.