Minister Subhash Phal Desai Attack Dainik Gomantak
गोवा

Minister Phal Desai Attack: सां जुझे दी अरीयाल येथे मंत्री फळदेसाई यांच्यावर मातीफेक, पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज

धार्मिक सलोखा राखण्यासाठी याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे स्पष्टीकरण फळदेसाई यांनी दिले आहे.

Pramod Yadav

Minister Subhash Phal Desai Attack

सां जुझे दी अरीयाल येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून, समाजकल्याण आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर मातीफेक करण्यात आली आहे.

मंत्री फळदेसाई सां जुझे दी अरीयाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आनावरण करुन परतत असताना ही घटना घडली. जमावाने फळदेसाई यांच्या दिशेने मातीफेक केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यात जमावावर सौम्य लाठीचार्ज करण्यात आलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री सुभाष फळदेसाई सां जुझे दी अरीयाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आनावरण करुन परतत असताना उपस्थित जमावाने त्यांच्यावर मातीफेक केली. संतप्त जमावाने फळदेसाई यांच्या दिशेने मातीफेक केल्यानंतर पोलिसांनी त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला.

संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, यात काही लोक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, धार्मिक सलोखा राखण्यासाठी याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करणार नसल्याचे स्पष्टीकरण फळदेसाई यांनी दिले आहे.

सां जुझे दी अरीयाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याला काही गावकऱ्यांकडून विरोध होत होता. गोव्यात शिवाजी महाराजांवरील गीत आणि घोषणा चालू देणार नसल्याची भूमिका काहींनी घेतली होता.

भाजप नेते सावियो रॉड्रिग्स यांनी याप्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र, परिस्थिती नियंत्रणात आली नाही.

दरम्यान, समाजकल्याण आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी या पुतळ्याचे आनावरण करण्यासाठी गेले. पुतळ्याचे आनावरण केल्यानंतर माघारी परतत असाताना फळदेसाई यांच्यासोबत हा प्रकार घडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

SCROLL FOR NEXT