Goa Smart Meters:  Dainik Gomantak
गोवा

Goa Smart Meters: राज्यात सर्वप्रथम राजधानी पणजीतील वीज ग्राहकांना मिळणार स्मार्ट मीटर्स

राज्यभरात स्मार्ट मीटर्स बसविण्यासाठी 396 कोटी खर्च येणार

Akshay Nirmale

Goa Smart Meters: राज्यातील वीज ग्राहकांना आता राज्य सरकारच्या वीज खात्याकडून स्मार्ट मीटर देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरची व्यवहार्यता तपासण्यासाठी वीज विभागाने सल्लागाराची नियुक्ती केली होती.

त्यानंतर आता ही प्रीपेड स्मार्ट मीटर बसवली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 396 कोटी खर्च येणार आहे. दरम्यान, राज्यात सर्वप्रथम राजधानी पणजीतील वीज ग्राहकांना ही स्मार्ट मीटर्स मिळणार आहेत.

मीटरच्या कामकाजातील तांत्रिक अडचणी समजून घेण्यासाठी, तसेच राज्यात इतर भागात ही मीटर्स बसविण्यापुर्वी पणजीत हा प्रकल्प प्रथम राबवला जाणार आहे. पणजी स्मार्ट सिटीतील वीज ग्राहक स्मार्ट मीटर वापरणारे राज्यातील पहिले ग्राहक असणार आहेत.

डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ओन, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOOT) तत्त्वावर स्मार्ट प्रीपेड मीटरिंगसाठी अॅडव्हान्सड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (AMI) सेवा प्रदात्याच्या नियुक्तीसाठी वीज विभागाने निविदा काढली.

या प्रकल्पाला ऊर्जा मंत्रालयाकडून रिव्हॅम्प्ड डिस्ट्रिब्युशन सेक्टर स्कीम (RDSS) अंतर्गत निधी दिला जात आहे. ज्यामध्ये वितरण पायाभूत सुविधा अपग्रेड करण्यासाठी राज्यांना प्रीपेड स्मार्ट मीटरिंग आणि सिस्टम मीटरिंगसाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.

दरम्यान, वीज विभागाला अद्यापही त्यांच्या सर्व ग्राहकांसाठी पूर्ण मीटरिंग कव्हरेज मिळालेले नाही. विभाग मीटरिंग प्रणालीचे आधुनिकीकरण डिजिटल मीटरपर्यंत करण्याच्या प्रक्रियेत आहे.

वीज खात्याने नोव्हेंबर 2022 पर्यंत 53,680 इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याचे ठरवले होते. त्यात 12444 मेकॅनिकल मीटर, 41188 सदोष मीटर आणि 48 नवीन मीटर्सचा समावेश आहे. तथापि, विभागाने केवळ 5830 म्हणजेच 10 टक्के मीटर बसवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT