Goa Beer Fest 2023: गोव्यात नोव्हेंबरमध्ये होणार बीअर फेस्ट, हेरिटेज कॉन्सर्ट

कासावली, ओल्ड गोव्यात होणार कार्यक्रम
Goa Beer Fest 2023
Goa Beer Fest 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Beer Fest 2023: गोव्यात ऑक्टोबरमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर विविध महोत्सव, कार्यक्रमांचे आयोजन होऊ लागते. सध्या गोव्यात 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

त्यानंतर 20 नोव्हेंबर पासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू होईल. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यातच गोव्यात बीअर फेस्ट आणि हेरिटेज कॉन्सर्टदेखील होणार आहे.

गोवा बिअर फेस्टिव्हल 2023

गोव्यात नोव्हेंबरमध्ये व्ही ग्रुपतर्फे बीअर फेस्ट होणार आहे. 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत कासावली येथील थ्री किंग्स वे येथे हा गोवा बीअर फेस्टिव्हल 2023 होईल.

या महोत्सवात लाईव्ह संगीताचा नजराणा असणार आहे. यात कोंकणी, हिंदी, इंग्रजी संगीताचा समावेश असेल. तसेच गोव्यातील काही प्रमुख गायक आणि डीजे यांचाही सहभाग यात असेल. नृत्य, मनोरंजन असा हा रंगारंग कार्यक्रम असणार आहे.

Goa Beer Fest 2023
Goa Admission: आता जेईई मेन किंवा NEET परीक्षेतून B.Pharm अभ्यासक्रमासाठी प्रवेश; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

कॉकटेल, मॉकटेल आणि गोवन पदार्थांचा आस्वाद येथे घेता येईल. या फेस्टमध्ये बीयर कमी दरात उपलब्ध होतील. 17 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजल्यापासून या बीयर फेस्टची सुरवात होईल. हा फेस्ट 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 पर्यंत असणार आहे. या फेस्टसाठी 200 रूपये तिकीट असणार आहे.

हेरिटेज कॉन्सर्ट

हेरिटेज कॉन्सर्ट हा गोवन संगीताच्या इंडो-पोर्तुगीज स्टाईलवर आधारीत असलेला खास क्युरेट केलेला कार्यक्रम आहे. तो श्रोत्यांना वेगळा संगितानुभव देईल.

घुमटच्या आदिवासी संगीतापासून ते गिटार, व्हायोलिन आणि मँडोलिनपर्यंतचे पाश्चात्य संगीत येथे ऐकता येईल. भारतीय परीप्रेक्ष्यात गोवन संगीताच्या वेगळेपण यातून मांडले जाणार आहे.

Goa Beer Fest 2023
Vishwajit Rane: गोव्यात आता ट्री हाऊस, रस्टिक टेंट सुद्धा... पर्यटकांसाठी इको टुरिझमचे आकर्षण

हेरिटेज कॉन्सर्टमध्ये सहभागी होणाऱ्यांना गोवन पदार्थ चाखण्याचीही संधी मिळेल. या इव्हेंटमधून मिळणारी रक्कम संग्रहालयासाठी जाईल. किंहबुना या संग्रहालयासाठी फंड रेझर म्हणूनच हा कार्यक्रम केला जात आहे.

11 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ओल्ड गोव्यातील म्युझियम ऑफ ख्रिश्चन आर्ट (MoCA) येथे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 3000 रूपये तिकीट असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com