Goa Chief Minister Pramod Sawant announcing the new slum rehabilitation housing policy Dainik Gomantak
गोवा

Goa Government: "झोपडपट्टी पुनर्वसन धोरण लवकरच आखणार!" मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा, बेघरांना मिळणार हक्काचे घर

Goa Slum Rehabilitation: गोव्यात जास्त झोपडपट्ट्या सूचित नाहीत. एक-दोन आहेत. त्यांच्यासाठी वेगळे धोरण आखले जाईल.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सासष्टी: गोव्यात जास्त झोपडपट्ट्या सूचित नाहीत. एक-दोन आहेत. त्यांच्यासाठी वेगळे धोरण आखले जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.दक्षिण गोवा व कुशावती जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी मुख्‍यमंत्र्यांनी आज मडगावात संवाद साधला. त्‍यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

‘माझे घर’ योजनेबाबत बोलताना मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, कायदेशीरदृष्ट्या सर्व अभ्यास करून ही योजना तयार करण्यात आली आहे. सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात मोठे प्रश्न उपस्थित होणार नाहीत.

दरम्‍यान, अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी समस्‍या मांडल्‍या. तसेच आमदार नीलेश काब्राल, आमदार उल्हास तुयेकर, द‌क्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई व पंच रुपेश देसाई यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन समस्‍या मांडल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT