शिवोली कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर यांच्या कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करताना गोवा कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर  दैनिक गोमन्तक
गोवा

राज्यपालांच्या असहकारामुळे 2017 मध्ये कॉंग्रेस सत्तेपासून वंचित

सामाजिक कार्यकर्ते तथा शिवोली कॉंग्रेसचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर यांच्या मार्ना शिवोलीतील कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर अध्यक्ष चोडणकर बोलत होते.

दैनिक गोमन्तक

शिवोली: 2017 च्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2017) गोमंतकीय जनतेने कॉंग्रेसच्या (Congress) बाजूने कौल दिलेला असतानाही तत्कालीन राज्यपाल म्रुद्रूला सिन्हा (Former Governor Mridula Sinha) यांच्या असहकारामुळेच कॉंग्रेस सत्तेपासून दुर राहिल्याचा स्पष्ट आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (GPCC President Girish Chodankar) यांनी शिवोलीत (Siolim Constituency) केला. सामाजिक कार्यकर्ते तथा शिवोली कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष दत्ताराम पेडणेकर यांच्या मार्ना शिवोलीतील कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन केल्यानंतर अध्यक्ष चोडणकर बोलत होते. यावेळी शिवोली गटाध्यक्ष पार्वती नागवेंकर, प्रभारी  बाबी बागकर, माजी आमदार तथा मंत्री अड. चंद्रकांत चोडणकर, तुलियो डिसोझा, चंदन मांद्रेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

गोव्याला नुकतीच भेट देऊन गेलेल्या माजी केंद्रीय वित्तमंत्री तसेच कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते पी. चिदंबरम यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक मतदार संघात कॉंग्रेस कार्यालये स्थापन होणे आवश्यक असून त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना दैनंदिन पक्ष कार्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम पेडणेकर यांनी या गोष्टीची दखल घेत शिवोलीत स्वतंत्र कार्यालय सुरु केल्याबद्दल चोडणकर यांनी त्यांचे कौतुक केले. माजी आमदार तथा मंत्री चंद्रकांत चोडणकर यांनी कॉग्रेस पक्षाचा देशाच्या विकास आणी प्रगतीत महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले.

गोवा स्वातंत्र्य चळवळीपासून ते राज्याला घटक राज्याचा दर्जा देण्याचे श्रेय केवळ कॉंग्रेसलाच जात असल्याचे सांगितले. दरम्यान, यंदा शिवोलीत कॉंग्रेस पक्ष इतिहास घडविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाबी बागकर, तुलियो डिसोझा तसेच दत्ताराम पेडणेकर यांची समयोचित भाषणे झाली. स्वागत गटाध्यक्ष पार्वती नागवेंकर यांनी केले . सुरुवातीला स्थानिक सेंट एन्थॉनी चर्चच्या धर्मगुरुंनी प्रार्थना केली व कार्यालयाला सदिच्छा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT