Siolim Accident Dainik Gomantak
गोवा

Siolim Accident: म्हापसा-शिवोली मार्गावर माती वाहतूक करणारा ट्रक पलटला; दुतर्फा वाहतूक कोंडी

Siolim Accident: या घटनेत ट्रक चालक जखमी झाल्याची माहिती समोर येतेय.

Ganeshprasad Gogate

Siolim Accident: म्हापसा - गणेशपुरी येथून शिवोली येथे माती वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने मार्ना येथील उतारावर ट्रक झाडाला आदळून पलटी झाल्याची घटना घडलीय.

या घटनेत ट्रक चालक जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. या घटनेसंबंधी मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार म्हापसा गणेशपुरी येथून कृष्णा राठोड हा आपल्या ताब्यातील ट्रक (गाडी नंबर GA 03 K 6342) माती भरून शिवोली येथे निघाला होता.

शिवोली येथील एका तीव्र वळणावर ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या कार आणि दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ट्रक लगतच्या काजूच्या झाडावर जाऊन आदळला.

या घटनेत वेगात असलेला ट्रक जागीच पलटी झाला आणि काजूचे झाड मोडून ट्रकवर पडले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून ट्रक चालकाच्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाल्याची माहिती मिळतेय.

रस्त्याच्या मधोमध ट्रक पलटी झाल्याने चारचाकी आणि अन्य वाहने अडकून पडली आहेत. तर रस्त्याच्या कडेने फक्त दुचाकीस्वार मोठ्या शिकस्तीने जात आहेत. हा अपघात सोमवारी सकाळच्या सुमारास घडल्याचे समजतेय. या घटनेसंबंधी सविस्तर माहिती अपडेट करीत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

आग भडकली, धावपळ सुरु झाली, 40 सेकंदात सर्व काही संपले! हडफडे दुर्घटनेप्रकरणी तिघे निलंबित; मालकाच्या अटकेसाठी पोलीस दिल्लीत

Partgali Math: सुमारे 1000 वर्षांपूर्वी सारस्वत ब्राह्मण गोव्यात आले, 550 वर्षांपूर्वी वैष्णवांनी पर्तगाळीत मठ बांधला..

Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT