Khandola News : खांडोळा, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे हे मोठे आव्हान असते. गोव्यासारख्या छोट्या राज्याने हे शिवधनुष्य पेलले. त्यात मंत्री गावडे यांचा मोठा वाटा आहे. त्यांना सातत्याने लक्ष देऊन क्रीडा स्पर्धा यशस्वी केल्या.
या स्पर्धा क्रीडा संघटनांसाठी, खेळाडूंसाठी महत्त्वाच्या होत्या. पावसाच्या व्यत्ययानंतरही प्रत्येक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. ही कौतुकास्पद कामगिरी आहे, असे मत सुरजीत सिंग यांनी गोविंद गावडे यांच्या गौरव प्रसंगी व्यक्त केले.
गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा प्रलंबित होती, मात्र गोविंद गावडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा गोव्याने यशस्वीपणे आयोजित केली.
त्यामुळे मुंबईतील क्रीडा संघटनेच्या सदस्यांनी आज गोविंद गावडे यांचा खास गौरव केला.
गावडे यांच्या बांदोडा येथील निवासस्थानी गौरवप्रसंगी मुंबइतील क्रीडा संघटक सुबोध सुळे आणि सुरजीत सिंग दाडीयाल उपस्थित होते.
क्रीडामंत्री गावडे म्हणाले, गोव्यात ‘ओपन सी वॉटर स्विमिंग’ खेळासाठी सर्व साधनसुविधा उपलब्ध असून गोव्यासोबत इतर राज्यांतील खेळाडूंनी लाभ घ्यायला हवा. स्पर्धांचे आयोजन झाल्यास अशा खेळाडूंना मोठी संधी मिळेल.
खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी गोवा सरकार नेहमी तयार आहे. आम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही चांगली कामगिरी करु शकलो, ते खेळाडूंमधील प्रतिभा आणि त्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळेच. त्यामुळे खेळाडूंबाबत सरकार कुठेही कमी पडणार नाही. आम्ही सतत प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.