Jitesh Kamat Shivsena Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Goa Political News: एका बाजूला मुख्यमंत्री गोमंतकीयांना १५ ते २० लाख रुपयांत पक्के घर बांधून देण्याची स्वप्ने दाखवतात आणि दुसरीकडे १३ लाख रुपये तात्पुरत्या झोपड्यांवर खर्च करत आहेत, असा गंभीर आरोप जितेश कामत यांनी केला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आगामी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेष दर्शनासाठी करण्यात येत असलेल्या काही कामांमध्ये मोजमाप करताना हेराफेरी करून पैसा लुबाडण्याचे षडयंत्र आखले जात आहे. रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये आणि बांधकाम प्रकल्पांसाठी ५० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. यातील किमान ३० टक्के भाजप सरकार आपल्या खिशात टाकण्याची योजना आखत असल्याचा आरोप शिवसेना उबाठा गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केला आहे.

कामत यांनी सांगितले, की येथेही सरकार संतांच्या उत्सवातले पावित्र्य नष्ट करून तिथे मोठा भ्रष्टाचार करण्याचे पाप करत आहे. जर्मन हॅंगर शामियांना, प्लॅटफोर्म, मंडप यासारखी बरीच कामे पूर्ण करून पवित्र अवशेष प्रदर्शन सोहळा संपन्न झाल्यावर हेच शामियाने वगैरे काढण्यात येतील. यावेळी मोजमापात फेरफार करून प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येणार असल्याचा संशयदेखील कामत यांनी व्यक्त केला आहे.

कामत यांनी निविदेसंदर्भात सांगितले, की लाकडाच्या पट्ट्यांसमवेत माडाची चुडते लावण्यासाठी ३१०५ रुपये प्रति चौरस मीटर निविदेत नमूद केले आहे. म्हणजे एका चुडताचे मल्ल लावण्यासाठी तब्बल ४००० ते ५००० रुपये एवढी किंमत आकारण्यात आली आहे. बांबूच्या चटईच्या खिडकीसाठी १०,६९५ रुपये प्रति चौरस मीटर दर निश्चित करण्यात आला आहे. आंब्याच्या लाकडाची चौकट बनवून त्यावर बांबूची चटई लावून दरवाजा बनवण्यात येणाऱ्या एका दरवाजाची किंमत तब्बल ३५ हजार रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे.

एका झोपडीसाठी १३ लाख रुपये!

सरकारने काढलेल्या निविदेत एका साध्या झोपडीसाठी १३ लाख रुपयांचा खर्च दाखविला आहे. एका बाजूला मुख्यमंत्री प्रमोद सावंत मूळ गोमंतकीयांना १५ ते २० लाख रुपयांत पक्के घर बांधून देण्याची स्वप्ने दाखवतात आणि दुसरीकडे त्यांचेच बांधकाम खाते १३ लाख रुपये तात्पुरत्या झोपड्यांवर खर्च करून जनतेचे पैसे बरबाद करत आहेत, असा गंभीर आरोपही जितेश कामत यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT