Shirgao School Dainik Gomantak
गोवा

Shirgao Primary School: चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ!! 57 वर्षे जुनी इमारत मोजतेय अखेरची घटका

नव्या इमारतीची मागणी : वर्गांचे बंद घरात स्थलांतर; मुलांची गैरसोय

गोमन्तक डिजिटल टीम

Shirgao School शिरगावच्या सरकारी प्राथमिक शाळेची इमारत मोडकळीस आली असून, या शाळेतील वर्ग तेथीलच एका बंद घरात स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचा आकडा पाहता, वर्ग स्थलांतरित करण्यात आलेली जागाही अपुरी पडत आहे.

त्यामुळे शाळेतील मुलांची गैरसोय होत आहे. मुलांना मोकळ्या वातावरणात ज्ञानार्जन करणे अवघड बनले आहे. सरकारने याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून या शाळेसाठी नवीन इमारत बांधावी.

स्थानिक आमदारांनीही यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. इमारत बांधण्यास चालढकलपणा झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही पालकांनी दिला आहे.

या शाळेतील वीजजोडणीही नादुरुस्त आणि धोकादायक अवस्थेत आहे. इमारत मोडकळीस आलेली त्यातच वीजजोडणीपासून लहान मुलांसाठी संभाव्य धोका ओळखून वर्ग स्थलांतरित करण्याचा निर्णय पालकांनी घेतला आणि अखेर तेथीलच श्री लईराई देवस्थानच्या मालकीच्या एका बंद घरात सोय करण्यात आली.

छपराला प्लास्टिकचे आच्छादन

नवनवीन उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेल्या शिरगावच्या सरकारी प्राथमिक शाळा इमारतीला ५७ वर्षे झाली आहेत. ही इमारत सध्या कमकुवत झाली असून, इमारतीच्या छपराची मोडतोड झाली आहे.

चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला पहिल्याच पावसावेळी या शाळेच्या वर्गात गळती सुरू झाली. गळती रोखण्यासाठी शाळेच्या पूर्ण छपराला प्लास्टिकचे आच्छादन घालण्यात आले आहे.

जमिनीवर बसण्याची वेळ

चालू शैक्षणिक वर्षासाठी शिरगावच्या सरकारी शाळेत २५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या मानाने वर्ग स्थलांतरित केलेली सध्याची जागा छोटी असून, ती जागा अपुरी पडत आहे. या जागेत विद्यार्थी दाटीवाटीने आणि जमिनीवर बसून शिकत आहेत. या प्रकाराबद्दल पालकही नाराज आहेत.

आमदारांचे आश्‍वासन: शाळा इमारत कमकुवत झाल्याबद्दल शिक्षण खात्याला कळविण्यात आले आहे. मात्र, शिक्षण खात्याने हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही.

शाळेच्या दुरवस्थेबद्दल आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या कानावर घातले असता, त्यांनी शाळा इमारतीची पाहणी करून दुरुस्त करून देण्याचे आश्वासन पालकांना दिले आहे. अशी माहिती पालक-शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष प्रेमदास गावकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

Mahindra XUV 3XO CNG : महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT