Ponda Road Issue: फोंडावासीयांना पुन्हा 'खड्ड्यांचे' ग्रहण; दुचाकी चालवणे हे एक आव्हानच

वाहनचालकांची तारांबळ ः तातडीने डागडुजी करण्याची मागणी
Ponda Road Issue
Ponda Road IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Road Issue शिमगा संपला तरी कवित्व उरते, या उक्तीप्रमाणे पावसाळा कमी झाला, तरी पावसामुळे पडलेले खड्डे मात्र अजूनही लोकांना त्रास देत आहेत. फोंडा शहराबरोबर ग्रामीण भागातही रस्त्यांची दुर्दशा झाली असून त्यामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपट उडताना दिसत आहे. यामुळे लोक कंबरदुखी आणि अन्य विकारांचे शिकार बनू लागले आहेत.

रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून वाहनचालक स्वतःला या खड्ड्यांपासून कसे वाचवावे, या विंवचनेने ग्रस्त दिसतात.

खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी अंगावर उडत असल्याने पादचाऱ्यांची तर तारांबळ उडतेच. एकीकडे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांकडे पाहायचे का खड्‍ड्यांकडे पाहायचे, या दुविधेत ते असतात.

Ponda Road Issue
Poll Panel Selection: एकेकाळी अडवाणींनी केली होती मागणी; आता मोदी सरकार करतंय विरोध, बदल करण्याची तयारी...

बहुतांश रस्त्यावर पथदीप नसल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे खड्ड्यात पडणाऱ्यांची संख्याही वाढायला लागली आहे. पावसापूर्वी हॉटमिक्स केलेले रस्ते सुध्दा मध्यंतरी पडलेल्या धुवांधार पावसामुळे वाहून गेले आहेत.

त्यामुळे हे ‘हॉटमिक्सिंग’ का कसले ‘मिक्सिंग’ असा प्रश्‍न नागरिकांना पडू लागला आहे. त्याशिवाय नगरपालिका पंचायत सार्वजनिक बांधकाम खाते मलनिस्सारण प्रकल्प, टेलिफोन निगम यांनी ऐन पावसाळ्यात खोदून ठेवलेले खड्डे लोकांच्या आता मुळाशी येऊ लागले आहेत.

फोंडा नगरपालिका ,कक्षेतील मारूती मंदिरासमोरचा मुख्य रस्ता तर अतिशय भेसूर झालेला दिसत आहे. हा शहराचा मुख्य रस्ता असल्यामुळे इथे साहजिकच वाहतूक जास्त असते आणि त्यामुळे वाहनचालकांना अधिक त्रास भोगावा लागत आहे.

Ponda Road Issue
Independence Day Parade: सचिन तेंडुलकरला मासेमारीचे धडे देणाऱ्या 'गोव्याच्या पेलेंना' केंद्र सरकारकडून आलंय आमंत्रण, वाचा नक्की काय घडलंय..

त्यामुळे आता तरी शासनाने जागे होऊन लवकरात लवकर या रस्त्यांना पूर्वस्थितीत आणावेत, अशी मागणी फोंडा तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यावर पसरलेल्या खड्ड्यामुळे तसेच रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे सध्या पाठदुखी, कंबरदुखीने अनेक लोक हैराण झाले आहेत.

दुचाकी वरून जाणे म्हणजे तर मोठे आव्हानच बनले आहे. फोंड्यातील सर्व मुख्य रस्ते सध्या दयनीय स्थितीत असून संबंधितांनी या रस्त्याची लवकरात लवकर डागडूजी करावी.

-प्रशील शेट पारकर, समाजसेवक, फोंडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com