Shantadurga Temple Dainik Gomantak
गोवा

Shantadurga Temple: 'धर्माच्‍या नावावर भेदभाव केला जाणार नाही'; जत्रोत्‍सवाच्या पार्श्वभूमीवर शांतादुर्गा संस्थानाकडून स्पष्टीकरण

Shantadurga Temple Cuncolim: फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण हे देवस्‍थान आजपर्यंत धार्मिक सलोखा आणि सर्व धर्मांतील लोकांना एकत्र घेऊन जाणारे देवस्‍थान म्‍हणून लौकिकास पोहोचले आहे.

Sameer Panditrao

Shantadurga Temple Cuncolim

मडगाव: फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण हे देवस्‍थान आजपर्यंत धार्मिक सलोखा आणि सर्व धर्मांतील लोकांना एकत्र घेऊन जाणारे देवस्‍थान म्‍हणून लौकिकास पोहोचले आहे. या देवस्‍थानाकडून कधीही धर्माच्‍या नावावर भेदभाव केला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया देवस्‍थान समितीचे अध्‍यक्ष कवेंद्र देसाई यांनी व्‍यक्‍त केली. सध्‍या गोव्‍यात मुस्‍लीम धर्मियांना जत्रोत्‍सवात दुकाने घालण्‍यास देऊ नका, अशी मागणी एका गटाकडून होत असताना शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवस्‍थानाने आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.

देसाई म्‍हणाले, हे देवस्‍थान धार्मिक एकोप्‍यासाठी संपूर्ण गोव्‍यात प्रसिद्ध आहे. शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण देवीला जसे हिंदू भाविक मानतात त्‍याचप्रमाणे ख्रिस्‍ती भाविकही मानतात. कुंकळ्‍ळीतील ख्रिस्‍ती भाविक शांतादुर्गा ही आपलीच देवी म्‍हणून या देवीच्‍या देवळात दर्शनासाठी येत असतात. एवढेच नव्‍हे तर या जत्रोत्‍सवात पिंजर (कुंकू) आणि कापूर विकणारे व्‍यावसायिक हे मुस्‍लीम धर्मीय असून मागची शंभर वर्षे ते नित्‍यनेमाने आपला पिंजर आणि कापूर घेऊन देवीच्‍या जत्रेत सहभागी होत असतात. हे व्यापारी सांगतात की, त्यांचे आजोबा-पणजोबा पूर्वी गाढवावरून माल घेऊन यायचे.

शांतादुर्गा कुंकळ्‍ळीकरीण संस्‍थानची यंदाची जत्रा ४ जानेवारीला सुरू होणार असून ९ जानेवारीपर्यंत ती चालेल. या निमित्ताने हजारो भाविक फातर्पा देवस्‍थानाच्‍या आवारात येणार आहेत. या सर्वांची सोय करण्‍यासाठी मंदिर समितीने योग्‍य ते उपाय घेतले आहेत. जत्रोत्‍सवाची माहिती देण्‍यासाठी आज कुंकळ्‍ळीकरीण देवस्‍थान समितीच्‍या कार्यालयात आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत देवस्‍थान समितीचे अध्‍यक्ष कवेंद्र देसाई, खजिनदार दर्शन देसाई, मुखत्‍यार सुभाष देसाई आणि सचिव विराज देसाई हे उपस्‍थित होते.

असा असणार जत्रोत्‍सवाचा कार्यक्रम

४ जानेवारी : पौष शुद्ध पंचमीला जत्रोत्‍सवाची सुरवात; सकाळी देवीला महाअभिषेक.

५ जानेवारी : सकाळी महाअभिषेक, रात्री शिबिकोत्‍सव, देवीची अंबारी रथातू्न मिरवणूक.

६ जानेवारी : सकाळी महाअभिषेक, रात्री जागर, शिबिकोत्‍सव, देवीची फुलांच्‍या रथातून मिरवणूक.

७ जानेवारी : सकाळी महाअभिषेक, रात्री देवीची विजय रथातू्न मिरवणूक.

८ जानेवारी : सकाळी महाअभिषेक, रात्री शिबिकोत्‍सव.

९ जानेवारी : पहाटे देवीची मिरवणूक, रात्री आरती.

१० ते १४ जानेवारी : देवीला अर्पण केलेल्‍या सोन्‍याचे दागिने, कपडे आणि इतर मौल्‍यवान वस्‍तूंची पावणी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT