Goa Shack Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

2026 27 tourist season: राज्‍य सरकारने गोवा शॅक धोरण २०२३-२६ ला आणखी एका पर्यटन हंगामासाठी, म्हणजेच २०२६-२७ साठी मुदतवाढ दिली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्‍य सरकारने गोवा शॅक धोरण २०२३-२६ ला आणखी एका पर्यटन हंगामासाठी, म्हणजेच २०२६-२७ साठी मुदतवाढ दिली आहे. पर्यटन विभागाने ९ सप्टेंबर रोजी जारी केलेली अधिसूचना गुरुवारी राजपत्रात प्रसिद्ध झाली. विद्यमान धोरणात किरकोळ बदल आणि काही अतिरिक्त अटींचा समावेश करण्यात आला आहे.

या धोरणानुसार, समुद्रकिनाऱ्यांवर तात्पुरते शॅक्‍स, डेक बेड, छत्र्या, टेबल, खुर्च्या आदी उभारण्यास परवाने दिले जातील. पर्यटन हंगाम १ सप्टेंबर ते ३१ मे असा असून, १० जूनपर्यंत शॅक्‍स हटवून जागा पूर्ववत करणे बंधनकारक आहे. शॅक्‍सची कमाल लांबी १८ मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ५.५ मीटर असेल. सांतावाड्डो किनाऱ्यावरील प्रवेशाजवळील पहिल्या चार शॅक्‍ससाठी लांबीची मर्यादा १२ मीटर आहे.

शॅक्‍सधारकांना कामकाजाच्या वेळेत सीसीटीव्ही सुरू ठेवून ३० दिवसांचे चित्रण जतन करावे लागेल. कर्मचाऱ्यांची पोलिस पडताळणी, गणवेश व पर्यटन विभागाचे ओळखपत्र आवश्यक आहे.

कासवांच्या किनाऱ्यांवर निर्बंध

कासवांच्या अंडी घालण्याची ठिकाणे असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर सायंकाळी ६ नंतर शॅक्‍सचे कामकाज, डेक बेडची मांडणी, बाहेरील कृत्रिम प्रकाश आणि मोठ्या आवाजातील संगीतावर निर्बंध राहतील. प्रत्येक नियमभंगासाठी एक लाख रुपयांची भरपाई आकारण्याची तरतूद आहे.

२० लाखांपर्यंत होऊ शकतो दंड

अनधिकृत डेक बेड, खुर्ची, टेबल किंवा छत्रीसाठी प्रत्येक वस्तूमागे ५ हजार रुपये दंड व जप्ती होईल. शॅक्‍स भाड्याने किंवा उपभाड्याने दिल्यास २० लाख रुपये दंड, सुरक्षा ठेव जप्त, परवाना रद्द आणि शॅक्‍स हटविण्याची कारवाई होऊ शकते. गंभीर नियमभंग करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचीही तरतूद आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukraditya Rajyog 2026: 17 ऑक्टोबरपासून सोन्याचे दिवस सुरु! शुक्रादित्य राजयोग बदलणार 4 भाग्यशाली राशींचे आयुष्य; सुख, समृद्धी आणि संपत्तीची होणार बरसात

मुलांना सोशल मीडिया निर्बंध गरजेचे, करिअरसाठी 'एआय' शिकण्यास प्राधान्य द्यावे- मंत्री रोहन खंवटे

खरी कुजबुज: ही निवडणूक की दहशतीचा खेळ?

Asian Games 2026: कमलजीत आणि सुरुचीचा 'गोल्ड' निशाणा! नेमबाजीत भारतानं जिंकलं सुवर्णपदक; कोरियाच्या तगड्या आव्हानाला दिलं चोख प्रत्युत्तर

IND vs WI: रोहित-विराट पुन्हा मैदानात! भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिकेचा थरार कधीपासून? मोबाईल, टीव्हीवर फ्रीमध्ये कुठे पाहता येणार सामने?

SCROLL FOR NEXT