"चाणाक्य" पुरस्कार स्वीकारताना ज्येष्ठ पत्रकार अनिल चोडणकर सोबत अनंत जोशी व इतर मान्यवर Dainik Gomantak
गोवा

Goa: ज्येष्ठ पत्रकार अनिल चोडणकर "चाणाक्य" पुरस्काराने सन्मानित

मुरगांव तालुक्यातील ज्येष्ठ पत्ररकार(Journalist) व समाजकार्यकर्ते (Social workers)आनिल चोडणकर यांना "चाणाक्य" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: पब्लिक रिलेशन आॕफ इंडिया या संस्थेची दोन दिवशीय 15 वी जागतिक परिषद(World Conference) रायबंदर येथील हॉटेल फर्न कदंब येथे आयोजित करण्यात आली होती. ही संस्था प्रति वर्षी आपल्या परिषदेत आपल्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तीना चाणाक्य आणि कौटील्य पुरस्काराने सन्मानित करते.

विशेष बाब म्हणजे, या पुरस्कारासाठी पहिल्यांदाच पत्रकारांचा समावेश करण्यात आलेला असून गोव्यातील कांही वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी व वार्ताहर (Editors, correspondents and reporters)यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. गोव्यातील ग्रामीण भागातील पत्रकार गेली कित्येक वर्षे पुरस्कार तसेच सरकारी सवलती यापासुन वंचित राहिले होते.गोव्यात नव्यानेच स्थापन झालेल्या प्रेस क्लब गोवा या संस्थेने ग्रामीण पत्रकारांच्या समस्येची दखल घेऊन ग्रामीण पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या तालुका पातळीवरील पत्रकारांची पुरस्कार देण्याची शिफारस करुन पत्रकारांकडून नामांकन मागविण्यात आली होती.

आयोजकांनी आलेल्या नामांकनांची छाननी करुन गोव्यातील विविध भागातील दहा पत्रकारांची चाणाक्य पुरस्कारासाठी निवड केली.त्यामध्ये मुरगांव तालुक्यातुन ज्येष्ठ पत्रकार अनिल चोडणकर यांची निवड झाली.नुकत्याच पार पडलेल्या पब्लिक रिलेशन कौन्सिल आॕफ इंडिया यासंस्थेच्या दोन दिवशीय परिषदेत या संस्थेच्या 200 हुन अधिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत गोव्याचे कला आणि संस्कृती मंत्री मा.गोविंद गावडे (Minister Govind Gawde)यांच्याहस्ते आणि आयोजक संस्थेचे पदाधिकारी समवेत त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अनिल चोडणकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र आभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT