Goa: स्वयंसाहाय्य गटाकडून तयार करण्यात आलेले चॉकलेट व लाडू Dainik Gomantak
गोवा

Goa: रक्षाबंधनाची गोडी वाढवताहेत स्वयंसाहाय्य गट

Goa: खास ‘गिफ्ट हँपर’वर राखी मोफत; विविध स्वादांत चॉकलेटही उपलब्ध

Yeshwant Patil

पणजी : सध्या बाजारपेठेला (Goa Market) आणि लोकांनाही रक्षाबंधनाचे (Rakshabandhan) वेध लागलेले आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही या सणावर कोरोना (Covid) महामारीचे सावट पसरलेले असले, तरी भावा-बहिणीकडून (Brothers and Sisters) तो उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्याची गोडी वाढविण्यासाठी यावेळी स्वयंसाहाय्य गटांनीही (Self Help Group) खास ‘गिफ्ट हँपर’ उपलब्ध केले आहेत.

यासंदर्भात मेरशी येथील ॐ सातेरी स्वयंसाहाय्य गटाच्या ज्योती पालेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यंदाच्या रक्षाबंधनासाठी गटाकडून खास घरगुती चॉकलेट आणि लाडू तयार करण्यात आले असल्याचे सांगितले. मेरशी भागातील दहा स्वयंसाहाय्य गटांनी एकत्र येऊन ‘संघर्ष‌ ग्राम संघटने’ची स्थापना केलेली असून त्याच्या त्या अध्यक्षा आहेत. लाडूमध्ये ड्राय फ्रूट लाडूचाही समावेश असून त्याचे पाकीट वा बॉक्स हजार रुपयांपासून सुरू होते, असे त्यांनी सांगितले. घरात तयार करण्यात आलेल्या चॉकलेट या व्हॅनिला, आंबा, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, पिस्ता आदी सहा स्वादांमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्यावर ‘हॅपी रक्षाबंधन’ अशी अक्षरे कोरण्यात आलेली असून त्यामुळे या चॉकलेट जास्तच लक्ष वेधून घेतात. या चॉकलेट बाजारात उपलब्ध होणाऱ्या कंपन्यांच्या चॉकलेटप्रमाणे मोठ्या व चार फ्लॅपच्या लहान स्वरूपातही उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पालेकर यांनी दिली.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास चॉकलेट हँपर आणि लाडू हँपर तसेच दोन्हींचा समावेश असलेले हँपर उपलब्ध करण्यात आलेले आहेत. दिडशे, दोनशे रूपयांचे हँपर तयार करण्यात आलेले आहेत. दिडशेच्या हँपरमध्ये पाच लाडू व चार चॉकलेटचा समावेश केलेला आहे.‌ एका हँपरवर एक राखी मोफत भेट दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले. या गटाकडून विविध प्रकारच्या राख्याही तयार करण्यात आलेल्या आहेत.

‘ई-मार्केट’चा आधार
पणजीत ग्रामीण विकास यंत्रणेचे कार्यालय असलेल्या इमारतीत टेबले मांडायला जागा देण्यात आलेली आहे. तेथे विक्री केली जाते. तसेच प्रदर्शने व इतर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विक्री केली जाते, अशी माहिती पालेकर यांनी दिली. सरकारकडून आता ‘ई-मार्केट’ सुरू करण्यात आलेले आहे. अजून ते पूर्ण जोमाने सुरू झालेले नाही. ते सुरू झाल्यावर त्यावर सगळे पदार्थ मांडता येऊन आणखी जास्त वाव मिळेल, असे ॐ सातेरी स्वयंसाहाय्य गटाच्या ज्योती पालेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT