1200 विदेशी पर्यटकांची गोव्यात भटकंती

पैसे नसल्याने फॉरेनर्स बनले कफल्लक, व्हिसा संपल्याने अडचणींत वाढ, पेडण्यात 400 पर्यटकांची भटकंती
विदेशी पर्यटक
विदेशी पर्यटकDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: पर्यटनस्थळ (Tourim) असलेल्या गोव्यात (Goa) संचारबंदीमुळे (Curfew) किमान 1200 विदेशी अडकले आहेत. त्यातील किमान 400 विदेशी पर्यटक (Foreign Tourists) पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी-तेरेखोलसह किनारी भागात अडकून पडले आहेत. पैसे नसल्याने काहीजण कफल्लक झाले आहेत. त्यांना परत मायदेशी पाठवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शिवाय जे पर्यटक अडकले, तेही आपापल्या देशाच्या दूतावासाच्या संपर्कात आहेत. जे पर्यटक अडकले त्यांना त्या त्या देशातील सरकार दर महिन्याला काही पैसे पाठवत आहे. या पैशांतून हे विदेशी पर्यटक किनारी भागात राहतात.

पेडणे तालुक्यात किनारी भागात जे विदेशी पर्यटक व्हिसा संपून अडकलेले आहे किंवा ज्यांच्या व्हिसा आहे, ते भाड्याच्या घरात राहत आहेत. काही पर्यटक मोफत तर काही पर्यटक कमी भाडे देऊन वास्तव्य करत आहेत. किनारी भागात मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक अडकले आहेत. आता कोरोनाचे नियम आणि कर्फ्यू शिथिल केल्यामुळे ते इतरत्र बिनधास्त फिरत आहेत.

विदेशी पर्यटक
विदेशी पर्यटकDainik Gomantak
विदेशी पर्यटक
नियम पाळा; प्रवास करा; शारजाहातून 160 पर्यटक गोव्यात

या सर्व पर्यटकांची कोणत्या पद्धतीने सोय करता येईल, यासाठी पर्यटन संचालक मायकल डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली आणि पेडणेचे उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्या उपस्थितीत किनारी भागातील पंचायतीच्या प्रमुखांची बैठक कोरोना काळात झाली होती, त्या बैठकीत ज्या विदेशी पर्यटकांची व्हिसा संपून जे अडकून आहेत, त्यांना टप्प्या-टप्प्याने त्यांच्या देशात पाठवले जाणार आहे.

काही पर्यटकांनी घरे सोडली आहेत. काहीजणांना परत त्या घरात राहण्यास घरमालकांनी मुभा दिली आहे. शिवाय त्या पर्यटकांना घरात जेवणाची सोयही केली आहे. पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना जेवण घरपोच पोचवले जात आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात या विदेशी पर्यटकांची बरीच धांदल उडाली होती.

विदेशी पर्यटक
Goa Vaccination: विदेशी नागरिक ठरू शकतात ‘सुपर स्प्रेडर’

रशियन पर्यटकांचे अधिक प्रमाण

पेडणे तालुक्यातील मोरजी किनारी भागात मोठ्या प्रमाणात रशियन पर्यटक वास्तव्य करून असतात. दरवर्षी या किनारी 70 टक्के पर्यटक हे रशियन असतात. पर्यटनाच्या नावाखाली काही रशियन बेकायदेशीर व्यवसायही करतात. काहीजण गेस्ट हाऊस, वाहतूक व्यवसाय, हॉटेल, शॅक खासगी जागेत चालवतात. शिवाय मनी एक्स्चेंज, रात्री संगीत रजनी पर्यटन हंगामात आयोजित करण्यात त्यांचा सहभाग असतो. ठिकठिकाणी नाक्या-नाक्यावर पार्ट्यांचे फलक ते लावतात. काही रशियन पर्यटक केवळ पर्यटनाचा आनंद लुटत कुटुंबीयांसोबत वेळ घालवतात.

काहीजणांवर भीक मागण्याची वेळ

संचारबंदीमुळे अडकलेले पर्यटक सध्या मायदेशी परतण्यासाठी वाट पाहात आहेत. काहींचा व्हिसा संपला असल्याने त्यांनाही आपल्या देशात जाता आले नाही. अडकून राहिलेल्या पर्यटकांची आतापर्यंत व्यवस्थित सोय झाली. तरीही काही पर्यटक इकडे-तिकडे भडकत असून भीकही मागत आहेत. रस्त्यालगत, झाडाच्या सावलीत बसून काहीजण दारूही ढोसत असल्याचे चित्र अधून-मधून पाहावयास मिळते. जे कोणी आपल्या देशात जायला तयार आहेत, ते त्यांच्या देशाच्या दुतावासाच्या संपर्कात आहेत. भारतीय दूतावासातर्फे त्या देशातील दूतावासाशी संपर्क साधून कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना खास विमानाने पाठवण्याची सोय केली जाणार असल्याची माहिती पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com