Goa Sealed Club Dainik Gomantak
गोवा

Goa Sealed Club: सील केलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याने संशय, प्रशासकीय सावळागोंधळ की मिलीभगत? 'अग्निसुरक्षे'चे नियम धाब्यावर

Goa Club: राज्यातील वादग्रस्त आणि नियमबाह्य कृत्यांमुळे सील करण्यात आलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ माजली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील वादग्रस्त आणि नियमबाह्य कृत्यांमुळे सील करण्यात आलेले क्लब पुन्हा सुरू झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने खळबळ माजली आहे.

एकीकडे अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर कोणत्याही नवीन परवानग्या दिल्या नसल्याचे सांगत असताना, दुसरीकडे स्थानिक आमदार मात्र मुख्यमंत्री स्तरावर बोलणी होऊन परवानग्या मिळाल्याचा दावा करत आहेत. या परस्परविरोधी विधानांमुळे सर्वसामान्य जनतेत सरकार आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी वाढत असताना, फायर सेफ्टीचे नियम धाब्यावर बसवून हे क्लब पुन्हा सुरू झाले कसे? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रायकर हे तपासणी सुरू असल्याचे सांगत जबाबदारी झटकत आहेत, तर लोबो यांच्या विधानामुळे पडद्यामागे काही ‘सेटिंग’ झाली आहे का, असा संशय बळावत आहे.

थेट संचालकांनीच सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, जर अनधिकृतपणे क्लब सुरू असतील- आणि तिथे काही दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही कारवाई करत आहोत आणि बेकायदेशीर आढळले तर लगेच बंद करू.

दरम्यान, जर अग्निशमन दलाने ना-हरकत दाखला दिलेलाच नाही, तर हे क्लब कोणत्या आधारावर धाडसाने सुरू झाले? सरकारी यंत्रणेत ताळमेळ नाही की हे क्लब मालकांना पाठीशी घालण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत? असे प्रश्न जनतेला पडले असले तरी विरोधक मात्र गप्पच दिसतात.

आम्ही कोणत्याही सील केलेल्या क्लबला नवीन ‘फायर एनओसी’ दिलेली नाही. तसेच राज्यभर अशा बेकायदेशीर व्यवस्थापनाचे ऑडिट अजून सुरूच आहे. त्यातही आता क्लब सुरू झाले असल्यास मला त्याची कल्पना नाही.

- नितीन रायकर, अग्निशमन दलाचे संचालक

ज्या क्लबनी काम सुरू केले आहे त्यांनी परवानग्या घेतल्या आहेत. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी यावर चर्चा केली असून लेखी निवेदनही दिले आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार ज्यांनी क्लब सुरू केले त्यांनी कायदेशीर परवानगी घेतली आहे.

- मायकल लोबो, आमदार, कळंगुट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

6 वर्षांच्या रमाने 50 सेकंदात पूर्ण केले 8 श्लोक; गोव्याची चिमुकली बनली 'ग्रँडमास्टर'! 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नाव

बेबी एबी अन् रदरफोर्डचं तूफान! सलग 6 चेंडूंवर ठोकले 6 षटकार, मुंबई इंडियन्सची उडवली दाणादाण; 11 वेळा चेंडू गेला मैदानाबाहेर VIDEO

Vijay Hazare Trophy: मुंबईचा विजयी चौकार; गोवा संघाचा 87 धावांनी पराभव, अभिनव तेजराणाची शतकी खेळी व्यर्थ

'कुशावती' सुशासनाची तहान भागवेल? - संपादकीय

Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

SCROLL FOR NEXT