Goan Seafood गोवा आणि पर्यटन या समीकरणासोबतच गोवा आणि मासे हा ट्रेंड जगभर प्रसिद्ध आहे. पर्यटनासाठी येणारे बरेच जण इथल्या ताज्या मासळीवर ताव मारतात. परंतु पर्यटकांपेक्षा अस्सल गोवेकर मत्स्यप्रेमी आहेत आणि हे पुन्हा एकदा एका सर्वेक्षणावरून सिद्ध झालंय.
आज देशात दोन कोटी मच्छीमार आहेत. आठ किनारी राज्ये, अंदमान निकोबार बेटे, लक्षद्वीप धरून 7500 किलोमीटरस लांब किनारपटटीवर 2200 जातीचे मासे पकडले जातात. म्हणून गोवा, कोंकण, केरळात मासेखाऊंची एक अनोखी संस्कृती दिसते.
गोमंतकीयांचे मुख्य जेवण म्हणजे शीत-कडी. त्यातही कडी ही मासळीचीच असते. गोव्यात जशी ताजी मासळी प्रसिद्ध आहे, तशीच सुक्या मासळीलाही मोठी मागणी आहे. ताजी मासळी मिळाली नाही तर गोवेकर सुक्या मासळीवर ताव मारतात.
पूर्वी सुक्या मासळीचा लोक पुरुमेंत करायचे. पावसाळ्यापूर्वी जेथे फेस्त भरते, तेथे सुकी मासळी विकत घ्यायला लोकांची झुंबड उडायची. सुक्या मासळीत सर्वांत लोकप्रिय आणि चवदार असतो तो बांगडा व सुंगटे. या दोन्ही मासळीची कडी, किसमूर किंवा भाजून त्यावर खोबरेल तेल वगैरे घालून खाता येते.
एका सर्वेक्षणानुसार असे दिसून आलंय की गोव्यात वर्षाला प्रति व्यक्ती 78 किलो मासे खाते. या आकडेवारीवरून मासे खाण्यात गोव्याचा देशात दुसऱ्या क्रमांक लागत असल्याचेही समोर आलंय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.