Goa Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Sand Mining: गोव्यात बांधकामांना आता 'अच्छे दिन' 'मांडवी', 'झुआरी'त रेती उपशास मुभा; दरावरही येणार नियंत्रण

Goa Sand Mining: रेती उत्खननासाठी खाण व भूगर्भ खात्याकडून वैयक्तिक परवाने देण्यात येतील व प्रत्येकाला प्रतिवर्ष एक हजार घनमीटर रेती काढण्याची परवानगी असेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मांडवी व झुआरी नद्यांमधील रेती उत्खननासाठी गोवा राज्य तज्ज्ञ मूल्यमापन समितीने (सीईएसी) पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे राज्यातील पारंपरिक रेती उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे तसेच बांधकामांना चांगले दिवस आले आहेत.

रेतीच्या किंमतीत झालेल्या वाढीवरही नियंत्रण येणार आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात गोवा राज्य तज्ज्ञ मूल्यमापन समितीची बैठक झाली होती.

या बैठकीत मांडवी नदीतील सात क्षेत्र आणि झुआरी नदीच्या पाच क्षेत्रातील रेती उत्खनन करण्यासाठी समितीने पर्यावरण परवाना (ईसी) देण्यास सफारी केली आहे.

यंत्राद्वारे उत्खननास परवानगी नाही

राज्यातील रेती व्यवसायही ठप्प झाल्याने अनेकांचा उदारनिर्वाहाचे साधन बंद झाले होते. त्यामुळे पारंपरिक रेती व्यावसायिकांकडून रेती उत्खनन ठिकाणे निश्चित करण्याची मागणी होत होती. सरकारने रेती उत्खनन क्षेत्राचे मूल्यमापन करण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशावरून समिती स्थापन केली होती.

या समितीने आता दिलेल्या अहवालानुसार मांडवी व झुआरी नदीतील नमूद केलेल्या क्षेत्रात रेती उत्खनन करण्यास शिफारस केली आहे. यांत्रिकी पद्धतीने रेती उत्खनन करण्यासाठी या समितीने परवानगी दिलेली नाही.

पारंपरिक व्यावसायिकांना 70 टक्के परवाने

या रेती उत्खननासाठी खाण व भूगर्भ खात्याकडून वैयक्तिक परवाने देण्यात येतील व प्रत्येकाला प्रतिवर्ष एक हजार घनमीटर रेती काढण्याची परवानगी असेल. रेती उत्खनन ही पारंपरिक पद्धतीपुरती मर्यादित आहे. पावसाळ्यात रेती उत्खनन बंद ठेवणे सक्तीचे आहे.

इतर दिवशी सकाळी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रेती उत्खनन करता येणार आहे. पारंपरिक रेती उत्खनन व्यावसायिकांना पाठिंबा देण्यासाठी ७० टक्के परवाने हे त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT