पेडणे: समुद्राच्या किनारी असलेल्या गोव्यात काजू, बागायती, मस्त्यविक्री याशिवाय आणखीन एक व्यवसायाची परंपरा कायम आहे, तो व्यवसाय म्हणजे मिठाचा व्यवसाय. गोव्यात याला मोठं मीठ असं म्हणतात आणि आजही लोकं मोठ्या प्रमाणात या मिठाची खरेदी करतात. स्वयंपाकघराशिवाय झाडांना कीटकांची लागण झाल्याने त्यावर उपाय म्हणून या मिठाचा वापर केला जातो. सध्या आगरवाड्याच्या मीठ विक्रेत्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
आगरवाड्याच्या मीठ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार सरकार वेळोवेळी स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन उपक्रम राबवतो तसेच काहीवेळा आर्थिक मदत सुद्धा दिली जाते आणि अशीच मदत आता मीठाच्या व्यवसायाला देखील मिळावी अशी मागणी केली जातेय.
आगरवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून मीठाचा व्यवसाय केला जातो, मिठाचे भलेमोठे आगर असल्यानेच त्याला आगरवाडा असे नाव पडलं असं देखील म्हटलं जातंय. गोव्यात या मिठाला भरपूर मागणी असते आणि म्हणूनच बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय केला जातो. हीच मागणी लक्षात घेऊन सरकारने बंधारे बांधून मिठाच्या व्यवसायाला मदत करावी असं स्थानिक मीठ विक्रेते म्हणतायत.
आजपर्यंत सरकारने अनेकांना मदतीचा हात पुढे केला आहे आणि लोकं वेळोवेळी त्यांची मदत सुद्धा करून घेतात, मात्र अजूनपर्यंत सरकारने कधीच मिठाच्या व्यवसायाला मदत केलेली नाही, पण सरकारला मिठाच्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन द्यायचे असेल तर शापोरा नदीकाठी तुटलेल्या बंधाऱ्यांचे काँक्रिटीकरण करावे. गोव्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मीठ उत्पादन सुरू होते, मात्र यंदा झालेल्या पावसामुळे आणि बिघडलेले वातावरण यामुळे मीठ उत्पादनात अडचणी निर्माण होत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.