Salt Hacks: किचनमधील 'या' पांढऱ्या रंगाच्या गोष्टीचा वापर करून गंजलेली भांडी झटक्यात करा स्वच्छ

Cleaning Hacks: भाड्यांचा काळपटपणा कमी करण्यासाठी मीठा कसा वापर करावा हे जाणून घेऊया.
Salt Hacks
Salt HacksDainik Gomantak
Published on
Updated on

cleaning hacks salt on rusty utensils how to use read full story

काही वेळा भांडी जास्त वेळ वापरत नसल्यामुळे गंजतात. गंज लागल्यानंतर पुन्हा भांडी वापरणे कठीण होते. गंजलेले भांडे स्वच्छ करणे कठीण काम होते.

गंज स्वच्छ न केल्यामुळे, लोक त्यांना इतर भांडीपासून दूर ठेवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की किचनमध्ये ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या वस्तूने तुम्ही झटक्यात स्वच्छ करू शकता. किचनमध्ये असलेल्या मीठाने तुम्ही गंजलेली भांडी स्वच्छ करू शकता.

अनेकदा आपण सर्वजण आपल्या जेवणात मीठ वापरतो. पण तुम्ही फक्त खाण्यासाठी मीठ वापरू शकत नाही, तर घर आणि किचन स्वच्छ ठेवण्यासाठी देखील करू शकता.

किचन डस्टर करा स्वच्छ

मीठ वापरून तुम्ही स्वयंपाकघरातील डस्टर स्वच्छ करू शकता. बरेचदा लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी वापरलेले डस्टर अस्वच्छ झाल्यानंतर बदलतात. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते स्वच्छ करून नवीन बनवू शकता. यासाठी बादलीत गरम पाणी घेऊन त्यात 4 चमचे मीठ टाकून चांगले मिक्स करू शकता. त्यात कापड टाका आणि रात्रभर राहू द्या. आता ते बाहेर काढा आणि घासून पूर्णपणे स्वच्छ करा.

गंजलेल्या भागावर मीठ लावल्यास

गंजलेल्या भांड्यावर मीठ टाकल्याने गंजाचा थर स्वच्छ होऊ शकतो. ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे भांडी गंजतात. गंज काढण्यासाठी एका भांड्यात मीठ घ्या आणि त्यात व्हिनेगर टाकून मिश्रण तयार करावे. नंतर हे मिश्रण भांड्यावर टाकावे आणि काही वेळ ठेवावे. असे केल्याने भांड्यांवर पडलेला गंज काढणे सोपे होऊ शकते. भांड्यावर थोडासा गंज आला असेल तर ते फक्त टाकून स्वच्छ करू शकता.

प्लॅस्टिकच्या भाड्यांचा दुर्गंध होतो दूर

अनेक वेळा बाटली जास्त वेळ बंद ठेवली तर त्यातून खराब वोस येतो. हा वास कमी करण्यासाठी तुम्ही मीठचा वापर करू शकता. यासाठी बाटली उघडा, त्यात थोडं मीठ टाका आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने बाटलीतील दुर्गंधी निघून जाईल.

फरशी पुसण्यासाठी

मीठाचा वापर फरसी पुसण्यासाठी देखील करू शकता. फरशी पुसताना पाण्यात एक चमचा मीठ टाकावे. नंतर फरशी पुसावी. यामुळे फरशी चमकदार आणि स्वच्छ दिसते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com