Salt Farming In Goa
Salt Farming In GoaDainik Gomantak

Salt Farming In Goa: ...तर मिठागर चालविणारी शेवटची पिढी! ज्योकिम काब्राल

Salt Farming In Goa: युवापिढीचे दुर्लक्ष, रायबंदरची १९ मिठागरे बंद

Salt Farming In Goa

अन्न कोणतेही असो, परंतु त्यात जोपर्यंत चिमूटभर मीठ मिसळले जात नाही, तोपर्यंत ते पूर्णान्न होत नाही. चविष्ट होत नाही.

आईशिवाय माया नाही अन् मिठाशिवाय चव नाही, अशी म्हण आपल्या संस्कृतीत रुजली आहे. गोवा हे मीठ उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र असूनही या व्यवसाय नवी पिढी येत नाही.

दिवसेंदिवस मीठ उत्पादक कमी होत आहेत. रायबंदर रस्त्याच्या शेजारी पाच-सहा वर्षांपूर्वी २० मिठागरे सुरू होती, परंतु आता तेथे एक मिठागर ज्योकिम काब्राल नामक व्यक्ती चालवतात.

Salt Farming In Goa
Goa Loksabha Election: नुवेतही काँग्रेसची पीछेहाट शक्य; सिक्‍वेरांमुळे भाजपची बाजू वरचढ

आमचा हा पारंपरिक वडिलोपार्जित व्यवसाय असून पणजी शहरात आता केवळ मी एकटाच हा व्यवसाय करतो. आता मिठागर चालविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. मिठागर चालविण्यासाठी कुशल कामगार मिळणे कठीण झाले आहे.

मिठाला योग्य भाव मिळत नाही, त्यासोबतच अनेकदा नुकसानही सोसावे लागते, जर सरकारला हा पारंपरिक व्यवसाय आणि गोमंतकीय मिठागरे सुरक्षित ठेवायची असतील तर सरकारने यासंबंधी योग्य पाऊले टाकली पाहिजे. त्यासाठी योग्य योजना तसेच धोरण राबविणे गरजेचे आहे. अन्यथा मिठागर चालविणारी आमची शेवटची पिढी ठरेल, अशी मिठागरची कथा अन् व्यथा काब्राल यांनी मांडली.

मिठागरांच्या जागी आता बांधकाम होत आहे. परंतु मिठागरांचे संवर्धन संगोपन होणे काळाची गरज आहे. गोव्यात निर्माण होणारे मीठ हे अतिशय गुणकारी आहे. या मिठात मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला आवश्‍यक घटक असतात. हे मीठ घशासाठी अतिशय उत्तम आहे. समुद्रात जे सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी सोडले जाते, ते बंद करणे गरजेचे आहे, कारण या समुद्राच्या पाण्यापासूनच मीठ तयार होते.

- प्रा. डॉ. सविता केरकर,

जैविक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान अध्ययन शाखा, गोवा विद्यापीठ.

शासकीय मदत हवी!

सुरुवातील मिठागरातून पाणी काढायचे असते, तेव्हा मोठे पंप आणून पाणी काढतो. यासाठी सुमारे ७० हजार रुपये खर्च येतो. अनेक अधिकारी राजकीय नेते मिठागरांना भेट देतात, आश्‍वासने देतात, परंतु मिठागरांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या वाढीसाठी कोणतीच पाऊले उचलली जात नाहीत.

मिठागरे चालविणारे अनेक व्यावसायिक युके (इंग्लडला) जाऊन स्थायिक झाले आहेत. या मिठागरातून येणारे उत्पन्न मालक आणि कामगार यात समांतर वाटून घेतले जाते. या व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांसाठी सरकारने मदतीचा हात पुढे करावा, असे ज्योकिम काब्राल यांनी सांगितले.

- गंगाराम आवणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com