Goa Schools Reopening Dainik Gomantak
गोवा

Goa Schools Reopening: उन्हाळी सुट्टीनंतर परत वाजली शाळांची घंटा! डिचोलीतील शाळांत 95 टक्क्यांहून अधिक उपस्थिती; नवीन विद्यार्थ्यांचे औक्षण

goa schools reopen after summer vacation: उन्हाळी सुट्टीनंतर शनिवारपासून शाळांची घंटा वाजली असून, शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरवात झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: उन्हाळी सुट्टीनंतर शनिवारपासून शाळांची घंटा वाजली असून, शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरवात झाली. उन्हाळी सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस म्हटल्याबरोबर डिचोली शहरासह अन्य भागातील बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट, गडबड आणि गोंधळ जाणवत होता. पालकांचीही धावपळ दिसून येत होती.

डिचोली शहरासह बहुतेक शाळांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. एकाबाजूने शाळांची घंटा वाजल्याचा आनंद, तर दुसऱ्याबाजूने असह्य उकाड्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही काही प्रमाणात चिंतीत असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत होते. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने शाळाही लवकर म्हणजेच अकरा वाजता सोडण्यात आल्या.

नवीन शैक्षणिक वर्षाची घंटा वाजल्याने शाळांमध्येही कमालीचा उत्साह दिसून येत होता. काही शाळांमध्ये शाळेत आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि पालक-शिक्षक संघाने उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

डिचोलीच्या शांतादुर्गासह डॉ. के. बी. हेडगेवार आदी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. घंटा वाजल्यानंतर प्रार्थना झाली आणि नंतर प्रत्येक वर्गात किलबिलाट सुरू झाला. वर्गात बसवण्यात तसेच वह्या, पुस्तके आदी शालेय साहित्याची यादी देण्यातच शाळेचा पहिला दिवस गेला.

उन्हाळी सुट्टीनिमित्त विद्यार्थी शाळेपासून अलिप्त होते. शाळेत प्रवेश केल्यानंतर जुने विद्यार्थी मित्र एकमेकांना भेटले, गप्पागोष्टीही केल्या, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT