डिचोली: समाजातील विविध घटकांना एकत्रित करून ज्ञानप्रबोधनाची जडणघडण करणे म्हणजेच शिक्षणाचा पाया रचणे आहे. शिक्षणाची ही जडणघडण तोटक पल्ल्याची न ठेवता ती लांब पल्ल्यावर नेण्यासाठी जे अविरत कार्य करतात, त्यांच्याच कार्याला घवघवीत यश मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे आवश्यक ज्ञान म्हणजेच प्रभावी शिक्षण होय. पालकांनी पाल्यांच्या आवडी निवडी नुसार त्यांना शिक्षणाचा मार्ग चोखाळण्याची मोकळीक दिली पाहिजे. असे उद्गार गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी चोडण येथे बोलताना काढले.
चोडण शैक्षणिक संस्था संचलित रघुवीर आणि प्रेमावती साळकर उच्च माध्यमिक विद्यालय, दयानंद हायस्कूल आणि दयानंद प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात भगिरथ शेट्ये प्रमुख पाहूणे या नात्याने बोलत होते. यावेळी चोडणचे सरपंच कमलाकांत वाडयेकर, चोडण शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्रेमानंद महांब्रे, कार्यकारिणी सदस्य प्रशील साळकर, प्रकाश सुर्लिकर, साळकर उच्च माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापक शंकर चोडणकर, दयानंद हायस्कूलचे व्यवस्थापक दिलीप फोंडेकर, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष भानुदास चोडणकर, विद्यानंद खांडेपारकर, श्रीमती सुधा साळकर, पांडुरंग गांवकर, प्राचार्य संदीप सावळ, अॅनी जेम्स आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.