चांदेल परिसरात गव्यांचा धुमाकूळ

मिरची पिकाचे नुकसान: कृषी खात्याने भरपाई देण्याची मागणी
 cow
cow Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: चांदेल परिसरात गव्यांनी धुमाकूळ घातला असून अनेकांच्या पिकांचे नुकसान केले आहे. खास करून मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील शेतकरी मनोहर भाईप यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात गवे आणि इतर जंगली प्राण्यांनी नुकसान केली आहे. या नुकसानीची वनखात्याने आणि कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून योग्य नुकसान भरपाई द्यावी,अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.

या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी लोकवस्तीत घुसत असून बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. गव्यांकडून होणारी नुकसानी मोठी आहे. तेव्हा या गव्यांचा बंदोबस्त शासनाने करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

 cow
बोरी अपघातातील कँटर अद्याप रस्त्यावरच!

विर्नोडा-म्हस्कोण येथील नियोजित क्रीडा नगरीच्या जागेत मागच्या वर्षी पाच गव्यांचा एक कळप अडकला असून हा कळप विर्नोडा भागातील तिथल्या शेताची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहे. हा कळप मार्च एप्रिल महिन्यात आला असावा, असा अंदाज आहे. एका रानातून दुसऱ्या रानात जिथे चारा मिळेल तिथून हा कळप अन्नाच्या शोधण्यास आलेला आहे. जाण्यासाठी वाट नसल्याने तो अडकला होता, वनखात्याने त्यांची सुटका करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

विर्नोडा म्हस्कोण या ठिकाणी एका बाजूने रेल्वे मार्ग जातो, तर दुसऱ्या बाजूने तिळारी प्रकल्पाचे कालवे जात आहेत. या कालव्यातून उतरून जायला गवे घाबरतात. त्यामुळे ते याच ठिकाणी अडकून पडतात. स्थानिक शेतकऱ्यांनाही या गव्यांच्या कळपामुळे शेतात, बागायतीत जाणे धोक्याचे वाटत आहे.

वनखात्याचे दुर्लक्ष

गेल्या 10 ते 11 वर्षापूर्वी चांदेल, हसापुर, इब्रामपूर, हळर्ण तळर्ण, पत्रादेवी, कासार्वरणे हाळी या भागात हत्ती लोकवस्ती घुसून शेताची, बागायातीची, फळा-फुलांची नासाडी करत आहेत. पूर्वी मोठ्या प्रमाणात केळी बागायतीचे नुकसान करायचे, आता या गव्यांनी लोकवस्तीकडे मोर्चा वळविला आहे. गव्याबरोबरच माकड आणि खेतीही पूर्णपणे लोकवस्तीत घुसून थैमान घालत आहेत. घराची कौले, बागायतीचेही नुकसान करीत आहे. याकडे वनखात्याचे दुर्लक्ष होत आहे.

 cow
कचरा आणि स्क्रॅपयार्डची गोवा खंडपीठाकडून दखल

बिबटेही लोकवस्तीत

पेडणे तालुक्यात सर्वत्र लोकवस्तीत आणि हम रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचे कळप ठाण मांडून बसतात. जंगलातील बिबटे भक्ष्याच्या शोधात भटक्या जनावरांवर हल्ले करतात. त्यामुळे ते लोकवस्तीत येत आहेत. मोपा परिसरात विमानतळाजवळ मोठ्या प्रमाणात रानडुकरांची शिकारही वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com